शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

‘बोलबच्चनगिरी’मुळे खडसेंवर नाराजी

By admin | Published: December 09, 2014 3:23 AM

हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर विकासकामांना 4क् टक्के कपात लागू करण्याबाबतची घोषणा करून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढवून घेतली आहे.

नागपूर : हिवाळी अधिवेशनाच्या तोंडावर विकासकामांना 4क् टक्के कपात लागू करण्याबाबतची घोषणा करून महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाराजी ओढवून घेतली आहे. खडसे हे वरचेवर वादग्रस्त विधाने करून आपल्याला अडचणीत आणत असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत पक्षश्रेष्ठींकडे केल्याचे समजते.
राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती नाजूक असली तरी सध्या वेगवेगळ्य़ा खात्यांनी किती रक्कम खर्च केली आहे, त्याचा आढावा घेणो सुरू आहे. तो झाल्यावर मग निधीचे नियोजन कसे करता येईल, ते पाहून आणि कामाची प्रगती तपासून मग कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो. ही रुटीन बाब असून त्याची जाहीर वाच्यता केली जात नाही. या घडीला कपातीचे कुठलेही आदेश काढलेले नसताना खडसे यांनी कपातीची घोषणा केली. वस्तुत: खडसे यांच्याकडे अर्थ व नियोजन खाते नाही. मुख्यमंत्री दिल्लीला असल्याने केवळ पत्रकार परिषद घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली होती. खडसे यांच्या घोषणोमुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा-शिवसेनेचे आमदार कपातीच्या कल्पनेने धास्तावले होते. मंत्र्यांकडे कामे घेऊन येताना कपातीमुळे आपली कामे रखडणार ंिकंवा कसे याची विचारणा करीत होते.  (विशेष प्रतिनिधी)
 
पक्षश्रेष्ठींकडून मिळणार समज
खडसे यांनी फडणवीस यांच्या निवडीनंतर लागलीच बहुजन मुख्यमंत्री व्हायला हवा होता, असे विधान केले होते. मराठी शाळांमध्ये उर्दू भाषा शिकवण्याचे विधान करून शिवसेनेच्या नाराजीत भर घातली. 
 
शेतकरी मोबाइलचे बिल भरतात तर वीजबिल का भरत नाहीत, असे बोलून त्यांनी सरकारवर नाराजी ओढवून घेतली. मुख्यमंत्र्यांकडील नगरविकास खात्याच्या अधिकारावर अतिक्रमण करणारे आदेश परस्पर काढले. खडसेंना त्यांच्या बेलगाम वक्तव्यांकरिता पक्षश्रेष्ठींकडून लवकरच समज दिली जाईल, असे बोलले जाते.