शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

काँग्रेसमध्ये कंप : थोरातांचा नाराजीनामा; पक्षश्रेष्ठींकडून गंभीर दखल, पाटील तातडीने दिल्लीत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 6:45 AM

महाराष्ट्र काँग्रेसमधील वादाची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून, प्रभारी एच.के. पाटील यांना तातडीने दिल्लीत पाचारण केले.

नवी दिल्ली/मुंबई : विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीच्या उमेदवारी घोळावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या संघर्षाने टोक गाठले आहे. या निवडणुकीत झालेला पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर येत असून, त्यातूनच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेसचे राज्य प्रभारी एच.के. पाटील यांना पाठविलेल्या पत्रात विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शविल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याबरोबर काम करणे शक्य नसल्याचेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. महाराष्ट्र काँग्रेसमधील वादाची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतली असून, प्रभारी एच.के. पाटील यांना तातडीने दिल्लीत पाचारण केले. पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेऊन पक्षातील अंतर्गत घडामोडींची माहिती दिली. पाटील यांनी काँग्रेस अध्यक्षांसह काँग्रेस संघटन महासचिव के.सी. वेणुगोपाल यांचीही भेट घेतली.

मध्यम मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न राहील : पाटीलकाँग्रेसमध्ये असलेल्या मतभेदाची आपल्याला कल्पना असून, यातून मार्ग काढण्यात येईल, असा विश्वास एच.के. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला. पक्षश्रेष्ठींची भेट घेतल्यानंतर त्यांच्या सूचनेनुसार वेळ पडल्यास मुंबईत जाऊन काँग्रेसच्या विविध नेत्यांशी चर्चा करू. यातून मध्यम मार्ग काढण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही पाटील यांनी सांगितले. मात्र, नाना पटोले यांना पदावरून हटविण्याच्या संदर्भात मात्र त्यांनी स्पष्ट काहीही वक्तव्य केले नाही. काँग्रेस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, याच महिन्यात छत्तीसगडमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या महत्त्वपूर्ण बैठकीपूर्वी राज्याच्या राजकारणात काहीही विशेष घडण्याची शक्यता नाही.

मी माझ्या भावना मांडल्या काँग्रेसमध्ये जे राजकारण झाले त्याबाबत पक्षश्रेष्ठींकडे मी माझ्या भावना मांडल्या आहेत. याबाबत मला अधिक काहीही बोलायचे नाही. - बाळासाहेब थोरात 

राजीनाम्याचे पत्र असेल तर दाखवा. बाळासाहेब आमच्यासोबत बोलतच नाहीत, त्यांची तब्येत चांगली नाही. माझा त्यांच्याशी संपर्क नाही. काल कसब्यातील अर्ज भरतानाही सगळे नेते आले होते, थोरातांनी यावे, अशी आमची अपेक्षा होती. हे राजकारण आहे, याकडे लक्ष देण्याची गरज नाही. जनतेकडे, त्यांच्या कामाकडे आम्ही लक्ष देत आहोत.- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस.

मी सकाळी बाळासाहेब थोरात  यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.  तेव्हा मला याची कल्पना नव्हती. पक्ष मजबूत होण्यासाठी जेजे शक्य आहे, ते मी करणारआहे. दुर्दैवी बाब आहे, बाळासाहेब आमचे सहकारी आहेत, ते काँग्रेसचे ज्येष्ठ आणि संयमी नेते आहेत. यामागचे कारण काय, हे समजल्याशिवाय प्रतिक्रिया देणे उचित नाही. - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री

आत्मपरीक्षण व्हावे!माझा त्यांच्याशी संपर्क झालेला नाही, त्यांनी राजीनामा दिल्याची मला माहिती नाही. खरेच असे झाले असेल, तर काँग्रेसबरोबर एवढी वर्षे राहिलेले लोक असे का करत आहेत, याचे  काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मपरीक्षण केले पाहिजे, असे बाळासाहेब थोरात यांचे भाचे सत्यजीत तांबे यांनी सांगितले. तर अजित पवार म्हणाले, मी बाळासाहेबांना राजीनाम्याबद्दल विचारले. मी राजीनामा दिलेला आहे, तो माझा पक्षांतर्गत प्रश्न आहे. मी माझ्या पक्षातील वरिष्ठांशी बोलून पुढची भूमिका ठरविणार आहे, असे त्यांनी मला सांगितले.

 

टॅग्स :Balasaheb Thoratबाळासाहेब थोरातNana Patoleनाना पटोलेcongressकाँग्रेस