विहार तेंडुलकर- रत्नागिरी --कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वेतील कॅन्टीमध्ये साठणाऱ्या कचऱ्यावर आता प्रक्रिया होणार आहे. हा कचरा आता एका मशिनमध्ये साठवून त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. अशा स्वरुपाचे मशिन मडगावसह रत्नागिरी स्थानकावर ठेवले जाणार आहे. त्यामुळे यापूर्वी रेल्वे रुळांशेजारी टाकल्या जाणाऱ्या कचऱ्यावर कायमस्वरूपी उपाय निघणार आहे. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या गाड्यांमधील कॅन्टीनमध्ये साचणारा कचरा यापूर्वी रेल्वे धावत असतानाच टाकला जात होता. त्यामुुळे रेल्वे रुळाशेजारी मोठ्या प्रमाणावर कचरा साठत होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छ भारत, सुंदर भारत’ या संकल्पनेनुसार आता कोकण रेल्वेने या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे ठरवले आहे.कॅन्टीनच्या व्यवस्थापकाने हा कचरा कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव किंवा रत्नागिरी स्थानकावर जमा करायचा आहे. याठिकाणी कचऱ्यावर प्रक्रिया करणारी मशिन्स ठेवण्यात येणार आहेत. या मशिनमध्ये हा कचरा टाकण्यात येईल आणि त्यापासून खत बनवण्यात येणार आहे. त्यामुळे कचऱ्याची विल्हेवाट लागेल आणि त्याशिवाय कोकण रेल्वेला खतही उपलब्ध होणार आहे. इको फ्रेंडली असे हे मशिन असल्याने त्यापासून तयार होणारे खत हे ‘इको’ असणार आहे. कोकण रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच आता कॅन्टीनमधील कचरा गोळा केला जाणार आहे. कोकण रेल्वेने कॅन्टीनमधील कचऱ्याचा विषय गांभीर्याने घेतला असून, एकीकडे स्वच्छता आणि दुसरीकडे या कचऱ्याचे विघटन या दुहेरी हेतूने ही मशिन्स बसवण्याची नवीन योजना आखली आहे. लवकरच ती सत्यात उतरणार आहे. लवकरच ही योजना पूर्णत्वाकडे जाईल तेव्हा ते प्रवाशांसाठी सोयीचे होईल, हे निश्चित मानले जाते. (प्रतिनिधी)कचऱ्याची विभागणी होणारकॅन्टीनमधून जमा होणाऱ्या कचऱ्याचे ओला आणि सुका कचरा असे दोन प्रकार केले जाणार आहेत. त्यानंतरच त्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. यामधून विघटन होणारा कचरा मशिनमध्ये टाकण्यात येईल, तर उर्वरित कचऱ्यावर दाब देऊन तो जमिनीत पुरण्याची योजना आहे.रेल्वे वसाहतीत मशिनचा वापरमुंबईतील सीवूड भागात असलेल्या कोकण रेल्वेच्या वसाहतीतील कचऱ्याचे विघटन करण्यासाठी अशा स्वरूपाचे मशिन बसवण्यात आले आहे. या मशिन्सचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले होते. या मशिन्समुळे तेथील कचऱ्याचा प्रश्नच निकालात निघाला आहे. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावर हा प्रयोग करण्याचे ठरवण्यात आले. आता प्रायोगिकतत्त्वावर हे मशिन बसवण्यात येणार आहेत.वीस किलोसाठी ५० रुपयेरेल्वेतील कॅन्टीनच्या व्यवस्थापकाने हा कचरा रत्नागिरी किंवा मडगाव स्थानकात जमा करायचा आहे. २० किलोच्या एका पिशवीसाठी त्या व्यवस्थापकाला ५० रुपये देण्यात येणार आहेत. त्यामुळे व्यवस्थापकही या कचऱ्याबाबत अधिक सजग होतील, अशी आशा कोकण रेल्वेच्या सुत्रांनी व्यक्त केली आहे.कचऱ्याचे विघटन करणारी ही मशिन्स रत्नागिरी आणि मडगाव स्थानकांवर लवकरच बसवण्यात येणार असून त्या कचऱ्यापासून तयार होणारे खत हे कोकण रेल्वेच्या विविध ठिकाणी असलेल्या वसाहतींशेजारील ‘गार्डन’साठी वापरण्याचा विचार सुरू आहे. या खताचा मुख्य फायदा म्हणजे कोकण रेल्वेमार्ग मोठ्या प्रमाणावर स्वच्छ व सुंदर होईल. त्याचबरोबर दुसरीकडे या कचऱ्याचे विघटनही होईल.-वैशाली पतंगे,जनसंपर्क अधिकारी, कोकण रेल्वे.नव्या प्रक्रियेकडे लक्ष मडगावसह रत्नागिरीत मशिनव्दारे होणार कचऱ्यावर प्रक्रिया.रेल्वेतील कॅन्टीनमध्ये साठणाऱ्या कचऱ्यांवर प्रक्रिया.इको फ्रेंडली मशिनमधून तयार होणारे खतही ‘इको’चकोकण रेल्वेच्या इतिहासात प्रथमच कॅन्टीनच्या कचऱ्याची लागणार विल्हेवाट. स्वच्छता, कचऱ्याचे विघटन असे दुहेरी हेतू.मशिन्स बसविण्याची योजना लवकरच कार्यान्वित करणार. ४खत उपलब्ध होणार.
कॅन्टीनच्या कचऱ्याची लागणार विल्हेवाट
By admin | Published: March 09, 2015 9:20 PM