आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार, बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही: राहुल नार्वेकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2022 08:01 AM2022-11-08T08:01:40+5:302022-11-08T08:02:00+5:30

जोपर्यत सरकारकडे बहुमत आहे, तोपर्यत सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे बाहेर कोण काय बोलतात, त्याला काही अर्थ नाही.

Disqualification of MLAs will be decided in the Assembly itself those who speak outside have no meaning says Rahul Narvekar | आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार, बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही: राहुल नार्वेकर 

आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होणार, बाहेर बोलणाऱ्यांना अर्थ नाही: राहुल नार्वेकर 

googlenewsNext

सावंतवाडी :

जोपर्यत सरकारकडे बहुमत आहे, तोपर्यत सरकारला कोणताही धोका नाही. त्यामुळे बाहेर कोण काय बोलतात, त्याला काही अर्थ नाही. सर्वोच्च न्यायालयही विधानसभेचे महत्त्व अबाधित ठेवूनच निर्णय घेईल, अशी मला आशा आहे. त्यामुळे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय विधानसभेतच होईल, असा विश्वास विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी व्यक्त केला.

नार्वेकर हे सावंतवाडीतील घरी खासगी दौऱ्यानिमित्त आले होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विकासकामांचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते. आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयात होणार नाही. तो निर्णय विधानसभेतच होईल  कारण प्रत्येक व्यवस्थेने कोणते निर्णय घ्यावे, हे ठरलेले आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

ज्या जमिनी वर्षोनुवर्षे उद्योजकांना दिल्या आहेत, पण तेथे उद्योग उभारण्यात आले नाहीत. अशा या जमिनींबाबत सरकारने काही निर्णय घेतला पाहिजे. कारण सर्वसामान्य जनतेच्या जमिनी या विकासकामासाठी दिल्या आहेत. मग त्या जमिनी तशाच ठेवणे योग्य नाही. त्या जमिनीवर उद्योगधंदे आले पाहिजेत असे मत ही त्यांनी व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचा आहे. पण या जिल्ह्याचा तसा विकास झाला पाहिजे. येथील किनार्‍यावर सोयी-सुविधा निर्माण होण्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी मी पुढाकार घेण्यास तयार असल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. 

Web Title: Disqualification of MLAs will be decided in the Assembly itself those who speak outside have no meaning says Rahul Narvekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.