शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: ही काय भानगड! ९५ मतदारसंघात मतांमध्ये तफावत; मतदान अन् EVM ची मते कुठे जुळली नाहीत?
2
५० खोके एकदम ओके...राज्यात गाजलेली घोषणा पहिल्यांदा देणारा आमदारही निवडणुकीत पराभूत
3
Sambhal Violence : संभलमध्ये हिंसाचार भडकावल्याप्रकरणी सपा खासदार आणि आमदाराच्या मुलावर गुन्हा दाखल, पोलिसांकडून अनेक ठिकाणी  छापेमारी
4
"ज्यांना जनतेने ८० वेळा नाकारलं, ते रोखताहेत संसदेचं कामकाज’’, पंतप्रधान मोदींची टीका   
5
"नियोजित कट होता, त्यात माझा बळी गेला"; अजित पवारांवर राम शिंदेंचा गंभीर आरोप
6
४ जणांचा मृत्यू , २० हून अधिक पोलीस जखमी… संभलमध्ये बाहेरच्या लोकांना प्रवेश नाही; काय आहे प्रकरण?
7
कोण किशोर कुमार? आलियाने पहिल्याच भेटीत विचारलेला प्रश्न; रणबीर कपूरचा खुलासा
8
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
9
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
10
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
11
RIL share price: रिलायन्स इंडस्ट्रीजवर ब्रोकरेज बुलिश, रिस्क रिवॉर्ड अनुकूल; दिला खरेदीचा सल्ला
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अनेक नेत्यांचे राजकीय अस्तित्व धोक्यात; कुणी कमावलं तर कुणी काय गमावलं? जाणून घ्या
13
मासेमारी करणाऱ्या बोटीत सापडले पाच टन ड्रग्ज, तटरक्षक दलाची सर्वात मोठी कारवाई
14
स्टेजवर जाऊन बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडला केलं प्रपोज! दिलजीत दोसांझच्या पुणे कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल
15
अहिल्यानगरमध्ये भाजपच्या दोघांना, राष्ट्रवादीच्या एकाला मिळू शकते संधी; मंत्रिपदाचे सात दावेदार!
16
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
17
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
18
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
19
Adani Group shares: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त

खंडित वीजपुरवठा आता ‘नवप्रकाश’ योजनेतून

By admin | Published: November 17, 2016 2:13 AM

महावितरणने वीजबिल थकबाकीमुळे खंडित केलेला वीजपुरवठा ‘नवप्रकाश’ योजनेंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेत तब्बल अडीच लाखांहून अधिक ग्राहकांनी योजनेनुसार बिल अदा केले.

बारामती : महावितरणने वीजबिल थकबाकीमुळे खंडित केलेला वीजपुरवठा ‘नवप्रकाश’ योजनेंतर्गत सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेत तब्बल अडीच लाखांहून अधिक ग्राहकांनी योजनेनुसार बिल अदा केले. आता त्यांना नव्याने वीज जोडणी घेण्यास संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे, अशी माहिती महावितरणचे बारामती परिमंडळाचे मुख्य अभियंता नागनाथ ईरवाडकर यांनी दिली. महावितरणने ३१ मार्च २०१६ पर्यंत कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या उच्च व लघुदाब वीजग्राहकांसाठी महावितरणने १ नोव्हेंबरपासून ‘नवप्रकाश’ योजना सुरू केली आहे. बारामती मंडलांतर्गत बारामती, इंदापूर, दौंड, शिरूर, पुरंदर व भोर तालुक्यातील ६३ हजार ३१८ वीजग्राहकांकडे ८० कोटी १२ लाख ४५ हजार रुपयांची मूळ थकबाकी, १३ कोटी १६ लाख ७ हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी १ कोटी ६० लाख २५ हजार रुपयांची थकबाकी आहे. सातारा मंडलात ३९ हजार ७१८ वीजग्राहकांकडे १२ कोटी ९६ लाख ८० हजार रुपयांची मूळ थकबाकी, १ कोटी ४२ लाख ६२ हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी २५ लाख ९४ हजार रुपयांची थकबाकी आहे. तर सोलापूर मंडलात १ लाख ४७ हजार ५६८ वीजग्राहकांकडे ७२ कोटी १७ लाख ९५ हजार रुपयांची मूळ थकबाकी, ११ कोटी ३५ लाख ४१ हजार रुपयांचे व्याज, तसेच विलंब शुल्कापोटी १ कोटी ४४ लाख ३६ हजार रुपयांची थकबाकी आहे. बारामती परिमंडलांतर्गत बारामती, सातारा व सोलापूर या तिन्ही मंडलांत एकूण २ लाख ५० हजार ६०४ ग्राहकांकडे १६५ कोटी २७ लाख २० हजार रुपयांची मूळ थकबाकी, २५ कोटी ९४ लाख १० हजार रुपयांचे व्याज तसेच विलंब शुल्कापोटी ३ कोटी ३० लाख ५५ हजार रुपयांची थकबाकी आहे.‘नवप्रकाश’ योजनेत येत्या ३० नोव्हेंबरपर्यंत संपूर्ण मूळ थकबाकीच्या रकमेचा भरणा केल्यास त्यामध्ये ५ टक्के सूट दिली जाईल.