शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

सिलिंडर दरवाढीने गरिबांवर संकट

By admin | Published: March 07, 2017 1:26 AM

विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याला चढउतार होत आहे

पेठ : विनाअनुदानित सिलिंडरच्या किमतीत दर महिन्याला चढउतार होत आहे. ग्राहकाला बाजारभावानुसार सिलिंडर खरेदी करावे लागते. नंतर अनुदान बँकेच्या खात्यात जमा होते; पण गेल्या चार महिन्यांत सिलिंडरच्या किमतीत तब्बल २०० रुपयांची वाढ झाल्यामुळे विनाअनुदानित सिलिंंडरचे दर ७६१ रुपयांवर गेले आहेत. या दरात उच्च मध्यमवर्गीयांना व सामान्यांना सिलिंडर खरेदी करणे शक्य आहे; पण गरिबांच्या आवाक्याबाहेर असल्याने दरवाढीमुळे गरिबांवर संकट ओढवले आहे.गरीब व सामान्यांना अनुदानित सिलिंडर मिळतो, ही बाब खरी असली तरीही प्रारंभी सिलिंडरची खरेदी बाजारभावानुसार करावी लागते. दर महिन्यात वाढणाऱ्या किमतीमुळे त्यांच्यावर संकट ओढवले आहे. अनुदानाची रक्कम बँकेत जमा होण्यासाठी बरेच दिवस लागतात. ही अनुदानाची रक्कमदेखील लवकरात लवकर जमा व्हावी, जेणेकरून पुढील सिलिंडर घेताना हे पैसे वापरता येतील, अशी महिलांची मागणी आहे. एकीक डे गरिबांना गॅस कनेक्शन देण्याची योजना पंतप्रधानांनी आणली आहे; पण महागडे सिलिंडर घेण्यास त्यांच्याकडे पैसे नाहीत. महागाईने आधीच होरपळलेल्या लोकांना घरगुती सिलिंडरच्या दरवाढीने चटका दिला आहे.वाढत्या महागाईत गॅस सिलिंडरचे दर कमी करण्याची मागणी अनेक गृहिणींनी ‘लोकमत’शी बोलताना केली.(वार्ताहर)>दरवाढीने सामान्यांचे कंबरडे मोडले कोरेगाव मूळ : घरगुती गॅस सिलिंडरच्या नुकत्याच झालेल्या भरमसाट दरवाढीमुळे जनसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.'दुष्काळात तेरावा महिना' या उक्तीनुसार गॅस सिलिंडरचे भाव दिवसागणिक वाढत आहेत. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडरचे दर तब्बल ८६ रुपयांनी वाढले आहेत. त्यामुळे आता विनाअनुदानित गॅस सिलिंडर ७३८ रुपयांपासून ७७० रुपयांपर्यंत मिळत आहेत. सिलिंडरची दरवाढ आणि नागरिकांची गरज ओळखून काही एजन्सीधारक ग्राहकांचा गैरफायदा उचलत आहेत. दरवाढीनंतर पुरवठा कमी असल्याचे सांगत ग्राहकांना ताटकळत ठेवले जात आहे. गॅसच्या अनेक पावत्यांवर दरवाढीपूवीर्ची तारीख आहे. मात्र, सिलिंडर दरवाढीनंतर देण्यात आला असून जादा रक्कम वसूल करण्यात आली आहे. दुसरीकडे डिलिव्हरी दिल्यानंतर होम डिलिव्हरीसह जास्त शुल्क आकारले जात आहे. याबाबत कर्मचाऱ्यांसोबत वाद घातला असता पुढील डिलिव्हरीसाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते. विनापावती ब्लॅकने सिलिंडर देण्याचे प्रकार सर्रास सुरू आहेत. तर, दरवर्षी 'दिवाळी' देणेही ग्राहकांना सक्तीचे ठरत आहे ग्रामीण भागात अनेक एजन्सीसमोर सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे अनेक ग्राहकांनी सांगितले. वेबसाइटवर आॅनलाइन तक्रार केल्यास ती थेट कंपनीपर्यंत पोहोचते. तसेच या तक्रारी सोडवणे आणि पाठपुरावा करण्यासाठी विशेष प्रतिनिधीची नियुक्ती करण्यात आलेली असते. आॅनलाइन तक्रार केल्यानंतर कंपनीकडून तक्रारदाराला दूरध्वनीवर संपर्क करून समस्या जाणून घेतली जाते. पाठपुरावा करून योग्य कारवाई केली जाते. यामुळे त्रस्त ग्राहकांनी संबंधित कंपनीच्या संकेतस्थळावर आॅनलाइन तक्रार करावी. करा आॅनलाइन तक्रार अनेक ग्राहकांनी सिलिंडर नोंदणी केल्यानंतर दोन ते तीन दिवसांनी दरवाढ लागू झाली. विशेष म्हणजे अशा ग्राहकांना नोंदणी रद्द झाली आहे. नव्या दरवाढीनुसार पुन्हा नोंदणी करावी, असे संदेश प्राप्त झाले. याबाबत काहींनी तक्रार केली असता कंपनीने दिलगिरी व्यक्त करत पैसे 'रिफंड' करणार असल्याचे सांगितले. >सिलिंडरचे दर काय आहेत ते घरपोच आल्यांनतरच कळते. सिलिंडरच्या दराबाबत सध्या गृहिणींमध्ये चर्चा आहे. काही महिन्यांपूर्वी ५०० रुपयांत मिळणारे सिलिंडर आता ७६१ रुपयांवर गेले आहेत. अनावश्यक वाढ सामान्यांना परवडणारी नाही. छुप्या दरवाढीने गृहिणींच्या महिन्याच्या बजेटवर ताण आला आहे. - सविता गायकवाड, गृहिणी, पेठ>अनुदानित सिलिंडरची खरेदी बाजारभावानुसार बंद करून पूर्वीप्रमाणे सुरू करावी. विनाअनुदानित सिलिंडरची खरेदी करताना तेवढे पैसे घरी ठेवावे लागतात. एकदा सिलिंडर परत गेले, तर पुन्हा वितरक आणून देत नाही. वितरकाकडून स्व-खर्चाने सिलिंडर आणावा लागतो. हा नेहमीचाच अनुभव आहे. गरीब व सामान्यांना एकाच श्रेणीत ठेवून पुरवठा करावा.- सविता माठे, ग्रामपंचायत सदस्य, पेठ>बाजारभावानुसार घरगुती सिलिंडर खरेदी केल्यानंतर अनुदान बँकेत जमा होण्यासाठी काही दिवसांचा कालावधी जातो. अनुदान बँकेत लवकर जमा व्हावे. एकच कनेक्शन असल्यामुळे दुसरे सिलिंडर येईपर्यंत काटकसर करून वापरावे लागते.-ज्योती प्रधान, गृहिणी>दर महिन्याला वाढणाऱ्या दरामुळे बजेटवर ताण पडत आहे. छुपी दरवाढ करून सरकारने गरीब व सामान्यांवर अन्याय केला आहे. दरवाढीचा सर्वाधिक फटका मध्यमवर्गीयांना बसतो. त्यातल्या त्यात खरा ताण गृहिणींवर येतो.- कल्पना शेंडे, गृहिणी