शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
2
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
3
विधानसभेसाठी सूक्ष्म नियोजन... लोकसभेनंतर वेगळी स्ट्रॅटेजी; भाजप महाराष्ट्रात 'कमबॅक' करणार?
4
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
5
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
6
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
7
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
8
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
10
"ती कोणाची तरी पत्नी आहे...", सलमानने ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नावर सोडलं होतं मौन
11
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
12
हातात कोयता, भिंतींवर रक्त अन्..; 'सिंघम अगेन'नंतर टायगर श्रॉफच्या Baaghi 4 ची घोषणा, रिलीज डेटही जाहीर
13
तेलंगणा सरकारच्या नोटीसवर दिलजीत दोसांझचं भर कॉन्सर्टमध्येच खरमरीत उत्तर, म्हणाला...
14
जगभर: अमेरिकेत गर्भनिरोधक गोळ्या खरेदीचा सपाटा! विक्री पाहून कंपन्यांचेही डोळे पांढरे
15
Ruturaj Gaikwad वर अन्याय? Devdutt Padikkal नं कशाच्या जोरावर मारली बाजी? जाणून घ्या सविस्तर
16
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
17
रस्ते फुलले, प्रचंड उत्साह आणि देवाभाऊंचा जयजयकार; नागपुरात देवेंद्र फडणवीसांचं शक्तिप्रदर्शन
18
Zomato Share Price : ५०० पार जाणार Zomato चा शेअर; ब्रोकरेज बुलिश, पाहा काय म्हटलंय कंपनीनं?
19
War 2 मध्ये हृतिक रोशनसोबत थिरकताना दिसणार ही अभिनेत्री? चाहत्यांची उत्सुकता शिगेला
20
कांद्याचे भाव का वाढले, सोयाबीनच्या किमतीचं काय? कृषिमंत्र्यांनी दिलं असं उत्तर 

असंतोषाचा भडका, महाराष्ट्र बंदला हिंसक वळण, कोरेगाव भीमा, वढू येथील घटनेचे राज्यभरात पडसाद  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2018 5:41 AM

कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले.

मुंबई -  कोरेगाव भीमा (जि. पुणे) येथे सोमवारी झालेला हिंसाचार आणि वढू (बुद्रूक) येथे घडलेल्या अनुचित घटनेचे तीव्र पडसाद बुधवारी महाराष्ट्रभर उमटले. या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला मुंबई ठाण्यासह राज्यात अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळीचे गालबोट लागले. जमावाने केलेल्या दगडफेकीत काही पोलीस कर्मचारी व बसचे चालक गंभीर जखमी झाले, तर नांदेड जिल्ह्यातील हदगाव येथे शीघ्रकृती दलाच्या जवानांनी केलेल्या मारहाणीत विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.आंबेडकरी कार्यकर्ते सकाळपासूनच मोठ्या संख्यने रस्त्यांवर उतरल्याने सगळीकडे चक्का जाम झाला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासह सर्व मार्गावरील ठिय्या आंदोलने आणि ठिकठिकाणी रेलरोकोमुळे मुंबईची चहूबाजुंनी कोंडी झाली. चेंबूर नाका येथे स्कूलबसवर झालेल्या दगडफेकीनंतर आंदोलनाला हिंसक वळण लागले. कोल्हापुरात भीमसैनिक आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते आमनेसामने आल्याने तणाव निर्माण झाला.जमावाने शेकडो वाहनांची जाळपोळ केली. बीड आणि चंद्रपूरमध्ये भाजपा आमदारांच्या घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला, तर पुण्यात हिंदू जनजागरण समितीचे प्रमुख मिलिंद एकबोटे यांच्या घरावर जमाव चालून गेला. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनुचित घटना टळली. राज्यभर संतप्त पडसाद उमटत असतानाही पोलिसांनी अत्यंत संयमाने परिस्थिती हाताळत आंदोलन चिघळू दिले नाही. सायंकाळी ४ वाजता अ‍ॅड. आंबेडकर यांनी बंद मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र, तोपर्यंत राज्यभर असंतोषाचा भडका उडालेला होता.कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचारामागे हिंदुत्ववादी संघटनांचा हात असल्याचा आरोप करत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी महाराष्टÑ बंदची हाक दिली होती. बंदला महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, जातीमुक्त आंदोलन परिषद, एल्गार परिषद व संभाजी ब्रिगेड आदी संघटनांनी पाठिंबा दर्शविला होता.कोणाचीही गय नाहीकोरेगाव-भीमा येथे जी काही घटना घडली आहे, त्याची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. याप्रकरणी सखोल चौकशी करून जो कुणी दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.अटक होईल ही अपेक्षाकोरेगाव भीमामधील हिंसेला जबाबदार असलेले शिव प्रतिष्ठानचे संभाजी भिडे आणि हिंदू एकता आघाडीचे मिलिंद एकबोटे यांना अटक केली जाईल, अशी अपेक्षा बाळगून आम्ही हा बंद मागे घेत आहोत. बंदसाठी आम्हाला पाठिंबा दिल्याबद्दल मी जनतेचे अभिनंदन करतो, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले.संघ कार्यालयावर फेकली पेट्रोलची बाटलीपरभणी येथे दुपारी दोन वाजता काही अज्ञात इसमांनी बसस्थानक ते रेल्वेस्टेशन मार्गावर असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात खिडकीतून पेट्रोलची पेटती बाटली आत फेकली. त्यामुळे काही पुस्तके आणि साहित्य जळाले.आर्थिक फटका राज्यातील ३५ लाख किरकोळ विक्रेत्यांचे सुमारे 700 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा दावा फेडरेशन आॅफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनचे विरेन शहा यांनी केला आहे.वाहतूकदारांना मोठा फटका वाहतूकदार व सरकारच 2000 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने केला.लाठीमारात विद्यार्थ्याचा मृत्यूहदगाव (जि. नांदेड) : घटकचाचणीचा पेपर देण्यासाठी जात असलेल्या योगेश प्रल्हाद जाधव (१६) या दहावीच्या विद्यार्थ्याला आंदोलनकर्ता समजून जलदगती कृती दलाच्या जवानांनी बेदम मारहाण केली़ यात त्याचा मृत्यू झाला़ त्याच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत केली जाईल, असे राज्य सरकारतर्फे जाहीर करण्यात आले आहे.निलंग्यात १० पोलीस जखमीनिलंगा शहरात संतप्त जमावाने केलेल्या दगडफेकीत दहा पोलीस व काही नागरिक जखमी झाले. परिणामी, प्रशासनाने निलंगा शहरात काही काळ संचारबंदी लागू केली. तिथे एसआरपीच्या तुकड्या तैनात केल्या आहेत.मंत्रालयातही शुकशुकाटमंत्रालयातही शांतता पाहायला मिळाली. एरव्ही, मंगळवार आणि बुधवारी राज्यभरातून आपली निवेदने आणि मागण्यांसाठी नागरिक मंत्रालयात गर्दी करतात. बुधवारी मात्र, मंत्रालयात येणाºयांची संख्या तुरळकच होती.

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदBhima-koregaonभीमा-कोरेगावMumbaiमुंबई