शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे तर व्होट कटिंग मशिन..."; 'परिवर्तन महाशक्ती' तिसऱ्या आघाडीवर संजय राऊत बरसले
2
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?
3
Kolkata Doctor Case : "मृत्यूच्या काही तास आधी लेकीशी बोललो होतो..."; डॉक्टरच्या वडिलांनी CBI ला केली 'ही' विनंती
4
वडीगोद्री ते जालना मार्गावर बस - टेम्पोचा भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, १७ जखमी
5
Exclusive: 'युध्रा' मधून साऊथ ब्युटीचं हिंदीत पदार्पण, म्हणाली, "सिनेमात केवळ बाहुली बनून..."
6
अयोध्येत पुन्हा होणार प्राणप्रतिष्ठापना, २२ जानेवारीचा मुहुर्त, तयारीला सुरुवात, नेमकं काय होणार?
7
'बिग बॉसचे पहिले 4 सिझन गाजले नाहीत', केदार शिंदेंच्या वक्तव्यावर मेघा धाडेची लक्षवेधी कमेंट
8
तिरुपती लाडू प्रकरण : पवन कल्याण म्हणाले, "आता सनातन धर्म रक्षण बोर्ड स्थापन करण्याची वेळ आलीय"
9
'या' कंपनीच्या गोल्ड लोन व्यवहारावरील बंदी हटवली; रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय; शेअरमध्ये तुफान तेजी
10
शिवसेना-भाजपा वाद संपेना; आमदार योगेश कदमांविरोधात भाजपा पदाधिकारी संतापले
11
४०० पारचा प्रयत्न फसला; ३७ धावांत ४ विकेट्स! ३७६ धावसंख्येवर आटोपला टीम इंडियाचा पहिला डाव
12
जुना अनुभव फार डेंजर, बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय; अपक्ष आमदाराचा महायुतीला सूचक इशारा
13
Piccadily Agro Share : ही तर कमालच! १ लाखांचे झाले १ कोटी रुपये, मद्य तयार करणाऱ्या कंपनीकडून गुंतवणूकदारांवर पैशांचा पाऊस
14
आमदार आदित्य ठाकरेंना निमंत्रण; मनसेच्या 'व्हिजन वरळी'त काका-पुतणे एकत्र येणार?
15
Post Office Saving Scheme : Post Office ची सुपरहिट स्कीम! ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला मिळतील ₹९,२५०; पाहा स्कीमचे फायदे
16
iPhone 16 ची भारतात विक्री सुरू होताच खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड; मुंबई, दिल्लीत लागल्या रांगा  
17
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
18
मारु का सोडू? संभ्रमात पडल्यामुळं फसला जड्डू! शतकासह 'द्विशतकी' डावही हुकला
19
Aadhaar Card : Aadhaar मध्ये केवळ एकदा करू शकता 'हा' बदल; अनावधानानेही करू नका 'ही' चूक; पुन्हा संधी मिळणार नाही
20
उर्वशी रौतेला क्रिकेटर ऋषभ पंतला करतेय डेट? अभिनेत्री म्हणाली...

पावसाळ्यात रस्ता खोदाई

By admin | Published: July 22, 2016 12:47 AM

इंगळेनगर वसाहतीत जाणारा रस्ता भर पावसाळ्यात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदल्याने नागरिकांची अडचण होत आहे.

वारजे : वारजे जकात नाका भागातील इंगळेनगर वसाहतीत जाणारा रस्ता भर पावसाळ्यात ड्रेनेजलाइन टाकण्यासाठी खोदल्याने नागरिकांची अडचण होत आहे. या रस्त्यावर मुरूम व चिखलाचे साम्राज्य पसरले असून, वाहनचालकांसह पादचाऱ्यांना याचा त्रास होत आहे.जकातनाका परिसरात इंगळेनगर कॉलनी आहे. येथे मुख्य कमानीतून आत आल्यावर अजून एक कमान आहे. येथेच इंद्रायणी कॉलनीला लागूनच पालिकेतर्फे खोदकाम चालू आहे. पावसाळ्यात चालू असलेल्या या धिम्या गतीच्या खोदाईमुळे नागरिकांना त्रास होत आहे. रस्ता मुळातच अरुंद असल्याने या रस्त्यावर चारचाकी वाहने नेण्यास अडचण होत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. शिवाय, यांच्या ब्रेकर मशीनमुळे आवाजाचा त्रासदेखील होत आहे. याकडे महापालिका लक्ष देत नाही, अशी नागरिकांची तक्रार आहे.याबाबत स्थानिक मजूर व पर्यवेक्षकांना विचारणा केल्यावर काम करताना खाली कठीण खडक लागला आहे. त्यामुळे ब्रेकरने तोडायला उशीर होत आहे व कामचा वेगही मंदावला असल्याचे त्यांनी सांगितले.(वार्ताहर)>सुटीच्या दिवशीही काम येथील नागरिक लालचंद दांगट म्हणाले की, मागील ८ दिवसांपासून काम चालू असून, आतापर्यंत साधारण २० फूटच खोदाई झाली आहे. नागरिकांची अडचण लक्षात घेऊन पालिकेने सुट्टीच्या दिवसातपण काम करणे अपेक्षित असताना सुट्टीच्या दिवशी खुशाल काम बंद ठेवण्यात येते. याबाबत काम करणाऱ्या मजुरांना विचारणा केल्यावर ते प्रतिसादही देत नाहीत. तातडीच्या कामासाठी अधिकचे मनुष्यबळ व यंत्रासामग्री वापरून काम लवकर पूर्ण करायला हवे.