पुणे : कुणी दृष्टीहीन तर कुणी कर्णबधिर, काहींना मानसिक आजार, बहुविकलांगता, अध्ययन अक्षमता, मज्जातंतुचा आजार.... अशा जवळपास २२ विविध आजारांचा सामना करत असताना खचून न जाता राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे. ही परीक्षा दिलेल्या एकुण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५७ असून नियमित विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३ टक्क्यांनी अधिक आहे.राज्य शासनाच्या निर्णयानुसार, दिव्यांग विद्यार्थ्यांची एकुण २२ गटात विभागणी करण्यात आली आहे. त्यानुसार या विद्यार्थ्यांना परीक्षेदरम्यान आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यामध्ये अंशत: किंवा पुर्ण अंध, कर्णबधिर, भाषा व वाचादोष, अस्थिव्यंग, मानसिक आजार, अध्यक्षन अक्षमता, सेरेब्रल पाल्सी, स्वमग्न, बहुविकलांग, कुष्टरोग निवारित, शारीरिक वाढ खुंटणे, बौध्दिक अक्षम, स्नायुची विकृती आदींचा समावेश आहे. त्यानुसार राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता बारावीचा निकाल जाहीर केला आहे. अस्थिव्यंग असलेल्या सर्वाधिक १५८१ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी १४७३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तसेच दृष्टीहीन व अध्ययन अक्षमता असलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही एक हजारांहून अधिक होती. मज्जासंस्थेशी संबंधित आजार, वाढ खुंटलेले, भाषा व वाचा दोष, थॅलेसेमिया व अॅसिड हल्ला झालेले सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. या गटातील ९१ विद्यार्थी आहेत.नियमित विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांमधील उत्तीर्णतेत मुलींचीच संख्या अधिक आहे. एकुण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी २ हाजर १३१ मुलींनी परीक्षा दिली होती. त्यापैकी २ हजार २६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.८० असून मुलींची ९५.०७ टक्के एवढी आहे. एकुण २२ पैकी केवळ सिकलसेल गटात मुलांपेक्षा मुलींची संख्या अधिक होती. यामध्ये ३५ मुले व ४४ मुलींनी परीक्षा दिली होती. एकुण २२ पैकी ९ गटातील सर्व मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.------------------दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकाल -विद्यार्थी परीक्षेला बसलेले उत्तीर्ण टक्केवारीदृष्टीहीन ११५२ १०९९ ९५.४०कर्णबधिर १०६२ ९५३ ८९.७४अस्थिव्यंग १५८१ १४७३ ९३.१७अध्ययन अक्षम १०७७ १०२९ ९५.५४वाढ खुंटलेले २३ २३ १००थॅलेसेमिया १४ १४ १००अॅसिड हल्ला २ २ १००मज्जातंतुचा आजार ३२ ३२ १००भाषा व वाचा दोष २१ २१ १००इतर १३९२ १३०१ ९३.४६--------------------------------------------------एकुण ६३५६ ५९४७ ९३.५७
राज्यभरातील दिव्यांग विद्यार्थ्यांची कौतुकास्पद कामगिरी; बारावीचा निकाल ९३.५७ टक्के निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2020 3:21 PM
राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे..
ठळक मुद्देपरीक्षा दिलेल्या एकुण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण