ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 9 - व्हीआयपी कल्चरला चाप बसण्यासाठी वाहनांवरील लाल, पिवळे दिवे हद्दपार करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. याच्या अंमलबजावणीपूर्वीच पंतप्रधानांसह देशभरातील मंत्र्यांनी वाहनांवरील दिवे काढले. मात्र नागपुरातील काही अधिकाऱ्यांना वाहनांवरील दिव्याचा मोह सुटता सुटत नव्हता, अखेर सोमवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने सर्व विभागांना पत्र देऊन वाहनांवरील दिवे काढण्याच्या सूचना केल्या. शिवाय वायुपथकाला या संदर्भात रोज दहा वाहने तपासण्याचे आदेशही दिले.देशातील व्हीआयपी कल्चर बंद करण्यासाठी वाहनांवरील दिवे बंद करण्याचा निर्णय केंद्राने घेतला. १ मेपासून अंमलबजावणीला सुरुवात झाली. परंतु त्यापूर्वीच पंतप्रधानांसह राज्याच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेकांनी वाहनावरील दिवे काढले. नागपुरातही महापौरांपासून ते आरटीओ अधिकाऱ्यांनी दिवे काढले. परंतु राज्यस्तरावर याबाबत कुठलाही निर्णय किंवा अधिसूचना निघालेल्या नसल्याने काही अधिकाऱ्यांच्या वाहनांवर दिवा कायम होता. मागील आठवड्यात केंद्र सरकारचा अध्यादेश सर्व आरटीओ कार्यालयांना प्राप्त झाला. या आदेशाला अनुसरून नागपूर शहर आरटीओ कार्यालयाने सोमवारी सर्व विभागाना पदांना अनुज्ञेय असलेल्या वाहनांवरील दिवे काढण्याच्या सूचना केल्या. विशेषत: पोलीस पथकातीलही वाहनांनी अंबर दिव्याचा वापर न करता ह्यमल्टी कलर्सह्ण दिव्यांचा वापर करावा व त्या संदर्भातील मंजुरीचे स्टीकर आरटीओ कार्यालयातून घेण्याचा सूचना केल्या. या सोबतच आरटीओच्या वायुपथकाला रोज दहा दिव्यांची वाहने तपासण्याचे आदेश दिले आहेत.केंद्राच्या आदेशाची अंमलबजावणी होणारवाहनांवरील दिव्यांना घेऊन राज्य शासनाचे आदेश आले नसलेतरी केंद्राचे आदेश प्राप्त झाले आहे. त्यानुसार सर्व विभागातील अनुज्ञेय पदांना असलेल्या वाहनांवरील दिवे काढण्याचा सूचनाचे पत्र दिले आहे. वायुपथकालाही वाहने तपासण्याचे निर्देश दिले आहे.- शरद जिचकारप्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर (शहर)
"दिव्या"चा मोह आवरेना!
By admin | Published: May 09, 2017 10:46 PM