मुंबई : कर्णबधिर व इतर एटीकेटी विद्यार्थ्यांप्रमाणेच दिव्यांग विद्यार्थ्यांनाही अकरावीचा प्रवेश सुलभ होईल. कर्णबधिर विद्यार्थ्यांप्रमाणेच अंशतः अंध, पूर्णतः अंध, गतिमंद, अस्थिव्यंग, बहुविकलांग, अध्ययन अक्षम, स्वमग्न, सेरेबल पाल्सी अशा विविध आजाराने ग्रासलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीच्या सवलतींद्वारे अकरावी प्रवेश सुविधा आणि दहावीत इंग्रजी विषय स्वतंत्रपणे घेऊन उत्तीर्ण होण्याच्या निर्णयाला शासनाने मंजुरी दिली.राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव, संचालक यांनी यासंदर्भात आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. अकरावी प्रवेशासाठी इंग्रजी विषयासह किमान ५ विषयांत उत्तीर्ण होणे नियमांप्रमाणे आवश्यक आहे; मात्र या आधी विद्यार्थ्यांना दोन भाषा व चार ऐच्छिक विषय किंवा सहा विषयांऐवजी एक भाषा व ५ ऐच्छिक विषय घेण्याची परवानगी देण्यात आली होती. इंग्रजी हा विषय घेऊनच विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यास तो अकरावी प्रवेशास पात्र होत असल्याने या विद्यार्थ्यांसाठी अकरावी व पुढील शिक्षणाची दारे आपोआपाच बंद होत होती; या निर्णयामुळे आता कर्णबधिर, दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पुढील मार्ग मोकळा झाला. आणखी एक फेरी राबवण्याची मागणीशालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी अकरावीची आणखी एक फेरी राबविण्यात येणार का, याकडे विद्यार्थी, पालकांचे लक्ष लागले आहे.
दिव्यांग विद्यार्थ्यांना एटीकेटीमधून मिळणार अकरावीसाठी प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2021 4:45 AM