ठाणे : एकपात्री अभिनय, नृत्य, काव्यवाचन आणि विविध गीतांनी ठाणेकरांची रविवारची सकाळ बहरुन गेली. अभिनय कट्ट्यावर दिवाळी पहाट निमित्त सादर झालेल्या कार्यक्रमाने मनोरंजनाचा भरगच्च व दर्जेदार फराळ रसिकांना मिळाला.एकोपा ज्येष्ठ नागरिक संघ व अभिनय कट्टा यांच्या वतीने हा कार्यक्रम झाला. ‘जय जयाजी गणेशा’ या गणेश स्तुतीने कार्यक्रमाला सुरु वात झाली. यानंतर प्रतिभा कुलकर्णी, वीणा टिळक, दिलीप नामजोशी, नेहा कुलकर्णी यांनी ‘माझी रेणुका माऊली’, ‘निघालो घेऊन दत्ताची पालखी’, ‘तोरा मन दर्पण कहेलाए’, ‘दिव्या दिव्यांची ज्योत सांगते’, ‘भातुकलीच्या खेळामधली’ अशी दर्जेदार गाणी सादर केली. सलोनी महाजन हिने गणेश वंदना सादर केली. ७२ वर्षीय माधुरी गद्रे यांनी ‘उंच माझा झोका’ यावर नृत्य सादर करत रसिकांची दाद तर गणेश गायकवाड व सहकारी यांनी सादर केलेल्या वासुदेवाने रसिकांना ठेका धरायला लावला. ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ व ‘हैदर’ या चित्रपटांतील एकपात्री प्रवेशांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. सलोनी महाजन, श्रावणी कदम, शुभांगी गजरे व शिल्पा लाडवंते यांनी लावणी फ्युजन सादर केले तर बालकलाकार आर्याने ‘प्रितीच्या झुल्यात झुलवा’ ही लावणी सादर केली. तर बच्चे कंपनीने सादर केलेल्या कोळीगीतांनी कार्यक्र माची लज्जत वाढवली. यानंतर कलाकारांनी सैनिकांना मानवंदना म्हणून ‘ए मेरे वतन के लोगो’ या गीतावर सादरीकरण केले. > शहिदांच्या कुटुंबियांना धनादेश-रोख रक्कमअखिल भारतीय मराठी नाट्या परिषद, ठाणे शाखेच्यावतीने दिवाळीनिमित्त रविवारी गडकरी रंगायतन येथे ‘हे सुरांनो चंद्र व्हा’ हा कार्यक्रम झाला. यात उरी हल्ल्यात शहीद झालेल्या महाराष्ट्रातील ४ जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. तर त्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी एक लाख पंचवीस हजाराचा धनादेश आणि शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने एक लाख रोख रक्कम देत सामाजिक बांधिलकीही जपली. शहीद विकास उईके यांच्या आई बेबी ताई उईके, शहीद चंद्रकांत गलांडे यांच्या पत्नी निशा गलांडे, शहीद संदीप ठोक यांचे वडील सोमनाथ ठोक तसेच विकास कुळमेथे यांच्या पत्नी स्नेहा व आई विमल यांना धनादेश आणि रोख रक्कम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दिली.विशेष मुलांची दिवाळी पहाट : सर्वसामान्यांप्रमाणे विशेष मुलांनीही दिवाळी पहाट साजरी केली. दिवाळी हा सण उत्साह आणि आनंदाचा सण. हा आनंद अपंग व मूकबधिर मुलांनाही मिळावा यासाठी झालेल्या ‘एक पहाट आपुलकीची’ या कार्यक्रमात विशेष मुलांनी सहभाग घेऊन दिवाळीचा आनंद घेतला. भाजपाचे कार्यकर्ते डॉ. राजेश मढवी यांच्या वतीने घंटाळी येथील साईबाबा मंदिर येथे हा कार्यक्रम झाला. यात पीपल्स एज्युकेशन सोसायटी व होली क्र ॉस विशेष शाळेतील मुले सहभागी झाली होती.
अभिनय कट्ट्यावर दिवाळी पहाट
By admin | Published: October 31, 2016 3:52 AM