लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पोलीस पत्नी दीपाली गणोरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेला मुलगा सिद्धांत याची पोलीस कसून चौकशी करत आहेत. तर दीपाली यांना परदेशात उच्च शिक्षण घेत तेथेच करिअर करायचे होते. मात्र कुटुंबाच्या जबाबदारीमुळे त्यांना ते शक्य होत नव्हते. यातूनच घरात खटके उडत असत, अशी माहिती चौकशीतून समोर येत आहे. सांताक्रूझ पूर्वेकडील प्रभात कॉलनीतील एजी पार्कमध्ये गेल्या तीन वर्षांपासून पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर गणोरे सहकुटुुंब राहतात. त्यांची पत्नी दीपाली उच्चशिक्षित होत्या. पुढील शिक्षण घेण्यासाठी त्यांना परदेशात जायचे होते आणि तेथेच करिअर करायचे होते. मात्र गणोरे यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतले. स्यामुळे घरचेच आपल्या करिअरमध्ये अडसर ठरत असल्याची सल दीपाली यांच्या मनात निर्माण झाली होती. तो राग त्या पती आणि मुलावर काढत होत्या. त्यातच मुलगा सिद्धांतने खूप शिकावे यासाठी त्या आग्रही होत्या. सिद्धांतच्या प्रत्येक हालचालीवर त्या लक्ष ठेवून होत्या. हे त्याचा मोबाइल, लॅपटॉप चेक करत असत. या जाचाला कंटाळून आईची हत्या केल्याची कबुली २१ वर्षीय सिद्धांतने दिली. या प्रकरणी वाकोला पोलीस अधिक तपास करत आहेत.
दीपालीला करिअरमध्ये वाटायचा कुटुंबाचा अडसर
By admin | Published: May 31, 2017 4:20 AM