सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका प्रभाग क्रं-१५ मधील सर्वसामान्य नागरिकांची दिवाळी साजरी होण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्या संकल्पनेतून व शांताई बोडारे फौंडेशनच्या वतीने २ हजार नागरिकांना फक्त ५० रुपयात दिवाळी साहित्य देण्यात आले. दिवाळी साहित्यात साखर, मैदा, शेंगदाणे, बेसन, उटणे आदी साहित्याचा समावेश होता.
उल्हासनगर कॅम्प नं-४ मधील ओटी सेक्शन परिसरसातील संतोषनगर, महादेवनगरसह विभागातील नागरिकांची दिवाळी आनंदात साजरी होण्यासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांच्या संकल्पनेतून व शांताई बोडारे फौंडेशनच्या वतीने दरवर्षी हजारो सर्वसामान्य नागरिकांना दिवाळी साहित्याचे वाटप केले जाते. यावर्षी प्रभाग क्रं- तब्बल २ हजार नागरिकांना दिवाळी साहित्याचे वाटप करण्याचा निर्णय फौंडेशनचे मुख्य व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत बोडारे यांनी घेतला. रविवारी सकाळी दिवाळी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नागरिकांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाला शिवसेना नेते धनंजय बोडारे, नगरसेविका वसुधा बोडारे, शीतल बोडारे यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी मोठया प्रमाणात उपस्थित होते.