मुंबई : डाळींच्या गगनाला भिडलेल्या किमती राज्य सरकारने आटोक्यात न आणल्याच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाच्यावतीने मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना डाळींची दिवाळी भेट पाठविण्यात येणार आहे, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.ते म्हणाले, की राज्य सरकारने आश्वासने दिल्यानंतरही डाळींचे भाव कमी झालेले नाहीत. मुख्यमंत्र्यांच्या हवाल्याने शिवसेनेने बुधवारपासून तूरडाळ १२० रुपये किलो होणार असल्याची घोषणा केली; परंतु तूरडाळ २०० रुपये किलो दरानेच विकली जात आहे. हरबरा, उडीद, मूग यांच्या किमती पूर्वपदावर आलेल्या नाहीत. राज्य सरकारने डाळींच्या आयातीपासून तर साठेबाजांवर छापे टाकण्यापर्यंत घोषणा केल्या. मात्र काहीही झाले नाही, अशी टीकाही विखे यांनी केली. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांना देणार डाळींची दिवाळी भेट
By admin | Published: November 05, 2015 12:56 AM