शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"अनेक राजे-महाराजे आले आणि गेले, पण…"; अजमेर शरीफसंदर्भात कोर्टाची नोटीस, PM मोदींवर भडकले ओवेसी
4
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
5
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
6
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
7
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
8
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
9
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
10
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
11
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
12
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
13
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
14
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
15
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
16
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
17
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
18
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
19
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
20
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज

स्वातंत्र्याची कवाडे खुली करणारी दिवाळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 11:41 PM

अंधार दूर सारून चहूकडे प्रकाश उजळण्याचा सण म्हणजे दिवाळी. गेल्या काही वर्षांत दिवाळीचे स्वरूप बदलले, माध्यमे बदलली.. पण आजही समाजाच्या कानाकोपऱ्यात

- स्नेहा मोरेअंधार दूर सारून चहूकडे प्रकाश उजळण्याचा सण म्हणजे दिवाळी. गेल्या काही वर्षांत दिवाळीचे स्वरूप बदलले, माध्यमे बदलली.. पण आजही समाजाच्या कानाकोपऱ्यात सण-उत्सवांच्या काळात ‘सेलीब्रेशन’बरोबरच समाजातील निसर्ग आणि सामाजिक जबाबदारीचा विचार करणाऱ्या व्यक्तीही आहेत. विलेपार्ले येथील आशिष कदम हे पेशाने कमर्शिअल आर्टिस्ट असून यंदा त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘फिडर लॅटर्न’ या हटके कंदिलांमुळे पिंजऱ्यात बंदीवान म्हणून राहणाऱ्या पक्ष्यांसाठी यंदाची दिवाळी स्वातंत्र्याची कवाडे खुली करणारी ठरत आहे.विलेपार्ले येथे राहणारे आशिष कदम यांनी यंदाची दिवाळी वेगळ्याप्रकारे साजरी करण्याचे ठरविले होते. त्याप्रमाणे, वेगवेगळ्या संकल्पनांचा अभ्यास सुरू होतो आणि मग अचानकच वेगळ्या प्रकारे कंदील बनविण्याचे सुचले. हा ‘फिडर लॅटर्न’च्या संकल्पनेचा जन्म त्यांच्या कुटुंबातील वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरून झाला. याविषयी आशिष कदम सांगतात की, कदम कुटुंबीयांमध्ये किंवा मग माझ्या मित्रपरिवारात कुणाचाही वाढदिवस असला की वाढदिवसाच्या सेलीब्रेशनची व्याख्या वेगळीच असते. कुणाचाही वाढदिवस असल्यास त्या दिवशी क्रॉफर्ड मार्केटमधून पक्ष्यांची खरेदी केली जाते आणि मग हे पक्षी एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात सोडले जातात. त्या पक्ष्यांना बंदीवान आयुष्यात कायमचे निसर्गाच्या कुशीत विसावण्यासाठी मुक्त केले जाते. गेली अनेक वर्षे प्रत्येकाच्या वाढदिवशी सातत्याने हा नियमच जणू कदम कुटुंबीयांच्या अंगी बाणला आहे, असेही ते आवर्जून सांगतात. दिवसा पक्ष्यांचे घरटे आणि रात्री प्रकाशमय होणारा कंदील यंदा सर्वांचेच आकर्षण ठरत आहे. फिडर लॅटर्नची संकल्पना भविष्यातही सुरू ठेवण्याचा मानस कदम यांनी व्यक्त केला आहे. शिवाय, यापुढील प्रकल्पांसाठीही निसर्गाचा विचार करून काम करायचे आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या संकल्पनेतून निसर्गाचा समतोल राखण्यासाठी मदत होत आहे. त्यामुळे प्रत्येक मुंबईकराने अशा उपक्रमांमध्ये जागरूक नागरिक म्हणून सहभागी होणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.‘फिडर लॅटर्न’चे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हा कंदील फुगा, टोपली, सुतळ आणि फेव्हिकॉल या साहित्यापासून बनविला जातो. साधारण: ३ ते ४ तास एवढा कालावधी एक कंदील बनवायला लागतो. संकल्पनेचे पहिलेच वर्ष असूनसुद्धा या कंदिलाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या संकल्पनेंतर्गत पार्ल्यातील हनुमान मार्गावर कदम यांनी स्वखर्चातून ८ फुटांचा ‘फिडर लॅटर्न’ साकारला आहे, हा कंदील पार्लेकरांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या कंदिलांच्या विक्रीतून मिळणारी रक्कम पक्ष्यांसाठी काम करणाऱ्या संस्थांना देण्यात येणार आहे.