ऑनलाइन लोकमतवाशिम, दि. 28 - दिवाळी या सणाला बंजारा समाजात अधिक महत्त्व दिले जाते. कुमारिका मुली या सणाची अतुरतेने वाट पाहतात. लक्ष्मी पुजनाच्या दिवशी तांड्यातील मुली नवीन कपडे परिधान करून हातात पणती (दिवे) घेऊन घरोघरी मेरा मागायला जातात.मेराची सुरुवात तांड्याचे प्रमुख नायक यांच्या घरापासून केली जाते. 'वर्षे दनेरी कोट दवाळी बापु तोन मेरा' म्हणत तांड्यातील प्रत्येक घरी मेरा मागायला जातात. दुसऱ्या दिवशी सकाळी जंगलात जाऊन 'बरू लांबडी' आणून प्रत्येकाच्या गोठ्यात जाऊन (शेणाचे) गोदन तयार केले जाते. त्यानंतर पुन्हा त्या गोदनाची पूजा करून दर्शन घेतात, अशा पद्धतीने दिवाळी सण बंजारा समाज उत्सवाने साजरे करतात. या मेरा कार्यक्रमामध्ये लहान मोठ्या मुली सहभागी असतात.
मेराचे महत्त्व दाखविणारी दिवाळी
By admin | Published: October 28, 2016 5:19 PM