दिवाळीनिमित्त फराळासह विविध मिठाई सुकामेवाही भेट म्हणून दिला जातो. त्यासह दिवाळीसाठी लागाणार्या विविध वस्तु एकत्र करुन त्याचे गिफ्ट बॉक्स बनवले जातात.
बाजारपेठांत जणू तारांगण अवतरावे असे रंगीबेरंगी आकाश कंदील सजले आहेत.
दिवाळीनिमित्त विविध खरेदी केली जाते. या सणाची घरोघरी जय्यत तयारी सुरू पूर्ण झाली असून बाजार गर्दीने ओसंडून वाहत आहेत.
कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून ही ओळखतात. तर कार्तिक शुद्ध द्वितीयेस भाऊबीज हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणीच्या घरी भाऊ गोडधोड भोजन करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते.
दिवाळीच्या निमित्ताने घरादाराची साफसफाई करून रंगरंगोटी केली जाते. सायंकाळी दारात रांगोळ्या काढून पणत्या लावतात घरांच्या दारात आकाशदिवे लावतात.
दिवाळीची पहाट उजाडते ती पणतीच्या मंद प्रकाशात आणि अंगणात सजलेल्या रांगोळीच्या सप्तरंगात. सध्या शहरात रस्तोरस्ती रांगोळीचे विक्रेते दिसू लागले आहेत.
अंधाराला चिरून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दिवाळीचा सण सर्वांचाच आवडता. दिव्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो.
त्यानंतर दुस-या दिवशी अश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन असते. या दिवशी घरोघरी आणि व्यावसायिक ठिकाणी परंपरेप्रमाणे मुहूर्तावर लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीचा आपल्यावर कृपा-आशीर्वाद राहावा यासाठी प्रार्थना केली जाते.
तर आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी पहाटे उठून सूर्योदयापूर्वी अभ्यंगस्नान केले जाते.