शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यांच्या तोंडांनाही टाळं लागलंय", PM मोदींनी महाविकास आघाडीवर चढवला हल्ला
2
मराठा तेवढाच मिळवावा, ओबीसी संपवावा असं मुख्यमंत्र्यांचं धोरण; लक्ष्मण हाकेंचा आरोप
3
"माझा तरुण मुलगा गेला, आरोपीला जामीन मिळाला, हा कोणता कायदा?"; आईने फोडला टाहो
4
घडलं असं काही की डिलिव्हरी बॉयने आयुष्यच संपवले; 'सुसाईड नोट'मुळे फुटली वाचा
5
काँग्रेसच्या जागा आमच्यामुळे वाढल्या; राऊतांनी दाखविला हातचा आरसा, दोन्ही पक्षांत तणाव वाढणार
6
IPL 2025 : राहुल द्रविडच्या टीममध्ये त्याच्या मित्राची एन्ट्री; राजस्थानच्या फ्रँचायझीचा मोठा निर्णय
7
'जोरात शॉट्स मारुन काचा फोडायचा अन्..';अशोक सराफ 'या' दिग्गजासोबत खेळायचे गल्ली क्रिकेट
8
राजीनाम्यानंतर शिवदीप लांडे हे प्रशांत किशोर यांच्या पक्षामधून राजकारणात उतरणार? दिलं असं उत्तर  
9
मुस्लीम परिसराचा हायकोर्ट न्यायाधीशांकडून मिनी पाकिस्तान उल्लेख; SC नं घेतली दखल
10
LLC 2024 : दिग्गज क्रिकेटपटू पुन्हा मैदानात! शिखर धवन-रैनाचे संघ भिडणार; जाणून घ्या सर्वकाही
11
महायुतीची कटकट वाढणार, गोपीचंद पडळकरही सरकारविरोधात उतरणार रस्त्यावर! मोठी घोषणा
12
HAL Stocks: हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लवकरच बनणार 'महारत्न' कंपनी; आताही गुंतवणूक करून होणार का कमाई?
13
पितृपक्ष: कालसर्प योगाचे चंद्राला ग्रहण, ८ राशींना शुभ काळ; पद-पैसा वाढ, अपार सुख-समृद्धी!
14
कोणत्याही हमीशिवाय ३ लाखांपर्यंत कर्ज... काय आहे पीएम विश्वकर्मा योजना? कुणाला मिळतो लाभ?
15
स्वप्नात मृतदेह दिसला अन् खेडमध्ये प्रत्यक्ष जंगलात सापडला; कोकणात रहस्यमय गूढ काय?
16
Pitru Paksha 2024: पितृपक्षात 'या' पाच ठिकाणी ठेवा दिवा; पितृकृपेबरोबरच होईल लक्ष्मीकृपा!
17
हात पाय बांधून मारहाण, बलात्काराची धमकी आणि..., लष्करी अधिकाऱ्याच्या होणाऱ्या पत्नीसोबत पोलीस ठाण्यात घडला धक्कादायक प्रकार  
18
चापून चोपून साडी नेसवून लिपस्टीक लावली! अभिजीतचा भन्नाट लूक पाहून निक्की म्हणाली- "बाsssई"
19
५० सेकंदांची फी ५ कोटी, प्रायव्हेट जेटने प्रवास; 'ही' अभिनेत्री आहे कोट्यवधींची मालकीण
20
भाजपाची ऑफर नाकारली, काँग्रेसमध्ये घरवापसी; खतगावकरांचा पुढचा प्लॅन ठरला?

मेंदूतील गाठीमुळे चालकाला चक्कर

By admin | Published: May 26, 2017 4:14 AM

उमा टॉकीज चौकात बुधवारी (दि. २४) झालेल्या एस. टी.अपघातप्रकरणी चालक रमेश सहदेव कांबळे

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : उमा टॉकीज चौकात बुधवारी (दि. २४) झालेल्या एस. टी.अपघातप्रकरणी चालक रमेश सहदेव कांबळे (वय ४२, रा. कांडगाव, ता. करवीर) याच्यावर येथील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात निष्काळजीपणे वाहन चालवून वाहनचालकांच्या मृत्यू व जखमीस कारणीभूत केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला. कांबळे याची सीपीआर रुग्णालयात तपासणी केली असता त्याच्या डोक्यातील मेंदूत गाठ (बे्रन ट्यूमर) झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या मेंदूतील गाठीमुळे मनुष्याला चक्कर येणे, फिटस् येण्याचा त्रास संभवतो, त्यातून ही दुर्घटना घडल्याची शक्यता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी गुरुवारी बोलून दाखविली.बुधवारी सायंकाळी हुपरी ते रंकाळा या एस. टी. बसने कोल्हापुरात उमा चित्रमंदिर चौकात सिग्नलला थांबलेल्या वाहनांना पाठीमागून चिरडले. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू तर दहा वाहनधारक गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात रिक्षा, चारचाकीसह एकूण १४ वाहनांचा चक्का चुराडा झाला. अपघातावेळी कांबळे हा बेशुद्धावस्थेत होता, त्यामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची चर्चा होती; पण दुर्घटनेनंतर दोन तासांतच सीपीआरमध्ये उपचार घेताना चालक कांबळे शुद्धीवर आला, त्यावेळी त्याने काय घडले, कसे घडले, येथे कसा आलो? याची काहीही कल्पना नसल्याचे उत्तर दिले. त्याने मद्यसेवन केले नव्हते, हे चाचणीतून स्पष्ट झाले आहे.या अपघातप्रकरणी बसचालक रमेश सहदेव कांबळे यांच्यावर रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच निलंबनाची कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुवारी एस. टी.चे कोल्हापूर विभाग नियंत्रक नवनीत भानप यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. रक्ताला चटावलेली बस कोल्हापूरातील उमा टॉकीज चौकात बुधवारी १४ वाहनांना चिरडणारी बस मुळची साताऱ्याची आहे. याच बसचे अपहरण करुन संतोष माने याने पुण्यात गर्दीत घुसवून अनेकांना चिरडले. होते. विशेष म्हणजे, दोन्ही अपघात बुधवारीच झाले आहेत. त्यामुळे रक्ताला चटावलेली बस असे तिचे नामकरण काल कोल्हापुरात घटनास्थळी जमलेल्या बघ्यांनी करुन टाकले. याची चर्चा आज साताऱ्यातही होती. ही एसटी बस (एमएच १४ बीटी १५३२) २०१२ पूर्वी सातारा विभागाच्या ताफ्यात होती.