शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

सांगलीत एका मिनीटात ज्ञानेश्वरी, उपक्रमात दहा हजार विद्यार्थी सहभागी

By admin | Published: August 24, 2016 7:29 PM

सांगली शिक्षण संस्थेच्या ९ हजार ७३७ विद्यार्थ्यानी बत्तीस दिवसात एक ओवी त्याला मिळालेल्या वहीत ३२० वेळा गिरवून ‘एक तरी ओवी.

ऑनलाइन लोकमत     

सांगली, दि. 24  : ‘बोला पुंडलिक वरदा...हरी विठ्ठल ...श्री ज्ञानदेव तुकाराम...,संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जयऽऽऽ, गोपालकृष्ण महाराज की जयऽऽऽ... ’च्या जयघोषात येथील सांगली शिक्षण संस्थेच्या ९ हजार ७३७ विद्यार्थ्यानी बत्तीस दिवसात एक ओवी त्याला मिळालेल्या वहीत ३२० वेळा गिरवून ‘एक तरी ओवी...एका मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्वरी ...’ हस्ताक्षराबरोबर मन घडवणारा उपक्रम पुर्ण केला . या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला.      

या उपक्रमाची सुरूवात १४ जुलैला झाली होती. याची सांगता आज २४ आॅगष्टला झाली.  जेष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष नितिन खाडीलकर, उपाध्यक्ष जनार्दन लिमये,कार्यवाह शशिकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत उपक्रम पुर्ण करण्यात आला. आज संस्थेने दिलेल्या कागदावर ९ हजार ७३७ विद्यार्थ्यानी एकाचवेळी एका मिनिटात एक या प्रमाणे दोन मिनिटात दोनवेळा याप्रमाणे एका मिनिटात ज्ञानेश्वरी लिहून पुर्ण केली .  

संस्थेच्या शताब्दि महोत्सवानिमित्त २६ जानेवारी २०१५ रोजी संस्थेच्या ७हजार ३३८ विद्यार्थ्यानी महालेझिमचा विश्वविक्रम केला ,याची नोंद गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये झाली, यानंतर संस्थेच्या विद्यार्थ्यानी एक कोटी सुर्यनमस्काराचा संकल्पही पुर्ण केला. विद्यार्थी दशेतच असे संस्कार होण्यासाठी सांगली शिक्षण संस्थेने ‘एक तरी ओवी...’ चा उपक्रम हाती घेतला .

ज्ञानेश्वरीस नुकतीच ७२५ वर्षे पुर्ण झाली त्याचे औचित्य आणि मराठीतील सर्वात प्राचीन व ७२५ वर्षे लाखो लोकांच्या नित्य वाचनातील ग्रंथ,समृध्द भाषा आण गोडवा तसेच भगवत्गीतेच्या श्लोकासहित ओव्यांची संख्या याचा विचार करुन  सांगली शिक्षण संस्थेने इयत्ता तिसरी ते आठवीपर्यतच्या ९हजार ७३७ विद्यार्थ्याना सहभागी करुन यापुर्वी कधीही न झालेला एक तरी ओवी ..एका मिनिटात संपूर्ण ज्ञानेश्वरी ...हस्ताक्षराबरोबर मन घडवणारा उपक्रम राबवला . या आगळ्या वेगळ्या उपक्रमास चांगला प्रतिसाद मिळाला.