कोरोनामुळे राज्यात अनेक मुलांनी आई वडील, तर काहींचे आई किंवा वडील असे छत्र गमावले आहे. त्यांच्यासाठी राज्य सरकार बाल संगोपमन योजना राबविण्याचा विचार करत असून राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांची भेट घेतली आहे. (Minister Yashomati Thakur met CM Uddhav Thackeray for children who lost mother, father in corona pandemic.)
ॲड यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेत महिला बाल विकास विभाग करत असलेल्या कामांची माहिती दिली. यावेळी कोरोनामुळे आई-वडील दोन्ही गमावलेल्या मुलांच्या नावावर बँकेत 5 लाख रुपयांचे फिक्स डिपॉझिट ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. तसेच ज्या मुलांचे आई किंवा वडील गेले त्यांच्या संगोपनासाठी महिन्याला 2500 रुपये देण्यात यावेत, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुचविले.
महाराष्ट्र सरकारच्या बाल संगोपन योजनेद्वारे ही मदत करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला. यावर मुख्यमंत्र्यांनी या प्रस्त्वावावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याचे ठाकूर यांनी सांगितले.