जळगाव : अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून शिक्षकांच्या उपक्रमात ढवळाढवळ रोखण्यासाठी शासनाने ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रम सुरू केला. विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांना खूप मोकळीक आहे. सर्वस्व पणाला लावा; वाट्टेल ते करा, मुले शिकलीच पाहिजेत. अन्यथा गाठ माझ्याशी आहे, असा दमच शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार यांनी येथे शिक्षकांना भरला.जिल्हा परिषद शिक्षण विभागातर्फे ‘प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र’ कार्यक्रमांतर्गत शनिवारी सकाळी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शिक्षणविस्तार अधिकारी, गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी संवाद कार्यशाळा झाली. नंदकुमार यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कमी पटसंख्येच्या शाळा बंद करत असल्याने शासनावर टीकेची झोड उठली आहे. परंतु त्यामागे दूरदृष्टी आहे. कमी पटसंख्येच्या शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या गावातील चांगल्या पटाच्या शाळेत समाविष्ट करून त्यांना शिक्षण देणे, हा त्याचा हेतू असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
वाट्टेल ते करा, मुले शिकलीच पाहिजेत
By admin | Published: March 13, 2016 4:51 AM