शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
5
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
6
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
7
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
8
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
9
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
10
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
11
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
12
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
14
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
15
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
16
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
17
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
18
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
19
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
20
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"

मुख्यमंत्र्यांची संगत नको रे बाबा! यापुढे फडणवीसांना बोलावणार नाही: अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 3:04 AM

कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी जाहीर केले.

मुंबई : २०१९च्या निवडणुकीपर्यंत कोणत्याही कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलवणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मंगळवारी जाहीर केले. आमचे मुख्यमंत्र्यांशी भांडण नाही, परंतु, यापूर्वी पक्षाच्या काही नेत्यांच्या सत्कार सोहळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे जनतेत संभ्रम निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार व दिलीप वळसे यांच्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. तर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सत्कार सोहळ्यातील उपस्थितीवरून टीका झाल्यानंतर त्यांनी त्या सोहळ्याकडे पाठ फिरवली. शिवसेनेने सरकारविरोधी भूमिका घेतलेली असताना राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये जवळीक वाढली असल्याची चर्चा सुरू झाली होती. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाच्या भूमिकेविषयी संभ्रम निर्माण झाला होता.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जतमध्ये नुकत्याच झालेल्या चिंतन बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला होता. त्यामुळे यापुढे कोणत्याही नेत्याच्या सत्कार सोहळ्यास मुख्यमंत्री अथवा भाजपाच्या नेत्यांना न बोलविण्याचा निर्णय झाला़ फसलेली कर्जमाफी, वाढलेले भारनियमन, बेरोजगारी, आधारभूत किंमत मिळत नाही आहे.सांगली पोलिसांच्या मारहाणीत झालेला आरोपीचा मृत्यू ही घटना सरकारसाठी अतिशय लाजिरवाणी आहे. सरकारला पोलिसांवर अंकुश ठेवता येत नसेल तर जनतेने कोणाकडे पाहायचे, असा सवाल पवारांनीकेला.प्रत्येक बाबतीत हे सरकार अपयशी ठरले असून ‘हे माझं सरकार नाही’ म्हणण्याची वेळ जनतेवर आली आहे. जाहिरातीवर सरकार चालत नाही हे भाजपावाल्यांना कधी कळणार, असा टोलाही पवार यांनी लगावला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस