हुंदका अन् आक्रोश : माळीण फाटा येथे आज 151 मृतांचा सामुहिक दशक्रिया विधी
घोडेगाव : माळीण दुर्घटनेत 151 जण दगावले. या सर्व मृतांचा सामूहिक दशक्रिया विधी रविवारी (दि. 1क्) माळीण फाटय़ावर होणार आहे. एकाच वेळी एवढय़ा मृतांचा दशक्रिया विधी होण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असेल. विधीसाठी या सर्वाचे एकच पिंड बनविले जाणार असून, या कार्यक्रमास सुमारे 8 ते 1क् हजार लोक येतील असा अंदाज आहे.
3क् जुलै रोजी माळीण दुर्घटना घडली. तेव्हा आठ दिवस मदतकार्य सुरू होते. या दुर्घटनेत 151 लोक मृत्युमुखी पडले. जेव्हा शेवटचा मृतदेह बाहेर निघेल व हे मदतकार्य थांबेल तेव्हा दशक्रिया विधीची तारीख ठरवू, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. त्यानुसार बुधवारी (दि. 6) मदतकार्य पूर्ण झाले व ग्रामस्थांनीच दि. 1क् रोजी सामूहिक दश्क्रिया विधी करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व प्रशासनाचे सर्वच विभाग करत आहेत.
माळीण गावातील शाळेपासून दशक्रियेसाठी नागरिक निघतील व माळीण फाटय़ावर दशक्रिया विधी होईल. या वेळी डिंभे येथील वैभवमहाराज राक्षे यांचे प्रवचन होणार असून, सर्व मृतांचे एकच पिंड बनवून दशक्रिया विधी होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व विधिवत धार्मिक विधी होणार असल्याचेपांडुरंगमहाराज येवले यांनी सांगितले आहे. दशक्रिया विधीला मोठय़ा संख्येने जनसमुदाय जमणार हे पाहून माळीण फाटय़ाकडे येण्यासाठी डिंभे ते अडिवरे व तळेघर ते माळीण फाटा असे दोन रस्ते तयार करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी येणा:या लोकांना डिंभे ते अडिवरे या रस्त्याने येथे पोहचता येईल व जाताना तळेघर मार्गे सोडले जाणार आहे. दशक्रिया विधीला येण्यासाठी कोणालाही अडवले जाणार नाही. वाहनतळामध्येच गाडय़ा लावाव्यात, रस्त्याच्या कडेला गाडय़ा लावू नयेत. डिंभे ते अडिवरे हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूककोंडी होते. येणा:या लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी
केले आहे. (वार्ताहर)
4दशक्रिया विधीसाठी जागा मोठी घेण्यात आली आहे. तसेच, वाहनतळ बनविण्यात आले असून, वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. दशक्रिया विधीसाठीच्या जेवणात कोणताही गोड पदार्थ न करता वरण भात व भाजी असे साधे जेवण ठेवण्यात आले आहे. एवढय़ा मोठय़ा समुदायाची जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी आमडे रोड, आसाणो रोड, माळीण फाटा अशा तीन ठिकाणी मोठे मांडव घालून यामध्ये जेवण ठेवण्यात आले आहे.
4डिंभे ते अडिवरे हा रस्ता खूप खराब झाला होता. याचेही खड्डे भरण्यात आले आहेत. तसेच तळेघर, कुशिरे मार्गे माळीण फाटा हा रस्ताही अनेक ठिकाणी खचला होता. त्याचीही दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे.
4माळीण गावातील शाळेपासून दशक्रियेसाठी नागरिक निघतील व माळीण फाटय़ावर दशक्रिया विधी होईल.