ऑनलाइन लोकमत
पिंपरी, दि. ३ - विविधतेला भेददृष्टीने पाहू नका, समतेच्या दृष्टीकोनातून पाहा, नुसत्या कायद्याने समरसता येत नाही त्यासाठी मनातून विषमता नाहिशी होणे गरजेचे आहे असे विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पिंपरी चिंचवड येथील मारुंजी येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
आपला देश शिवरायांना मानणारा आहे, संघाच्या सर्व स्वयंसेवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेतला पाहिजे असे भागवत म्हणाले. ज्या व्यक्ती सत्यनिष्ठ नाहीत, ते शीलसंपन्न होऊ शकत नाहीत, त्याग आणि चारित्र्याला खूप महत्त्व आहे असे भागवत म्हणाले.
सत्यम, शिवम, सुंदरम' ही आमची संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीची आज जगभर चर्चा आहे असे भागवत यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या शिवशक्ती संगम कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विनोद तावडे, राम शिंदे उपस्थित आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरएसएसने पश्चिम महाराष्ट्रात जोरदार शक्तीप्रदर्शन केले.