ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 29 - व्हॉट्स अॅपवरून दहशतवाद अथवा कुठलाही धोका आदी सांगणारे मेसेज फॉरवर्ड करताना सावध रहा. सध्याच्या भारत पाकिस्तान युद्धजन्य स्थितीमध्ये पाकिस्तानी हॅकर्स, सोशल मीडियावरची विकृत तरूणाई, भारतामध्ये अफवा पसरवण्याचं कारस्थान रचू शकतं. त्यामुळेच कुठे दहशतवादी हल्ला झाला, किंवा दहशतवादी दिसले किंवा कुठे स्फोट झाले असे वा तत्सम मेसेज व्हॉट्स अॅपवर किंवा फेसबुकवर आले तर ते खातरजमा न करता फॉरवर्ड करू नका.
मुंबईलगतच्या उरणमध्ये केवळ थ्रिल अनुभवण्यासाठी एका शाळकरी मुलीने दहशतवादी दिसल्याची अफवा पसरवली आणि जवळपास तीन दिवस सगळ्या परीसरामध्ये भीतीचं साम्राज्य पसरलं आणि तपासयंत्रणांना तीन दिवस हकनाक कामाला जुंपावं लागलं.
सोशल मीडियावर कार्यरत असणारे पाकिस्तानी स्लीपर सेल कदाचित जाणुनबुजून अशा अफवा पसरवण्याची भीती आहे, त्यामुळेच कुठलेही भलते सलते मेसेज आले तरी पॅनिक होऊ नका आणि योग्य प्रसारमाध्यमांमधून अशा बातम्या आल्या नसतील, सरकारी यंत्रणांनी शिक्कामोर्तब केलेलं नसेल तर असे फॉरवर्ड करू नका.