शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

रात्री दहानंतर चौकशी नको

By admin | Published: October 22, 2015 2:18 AM

कोठडी मृत्यूप्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याने, किरकोळ गुन्ह्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची रात्री दहानंतर चौकशी न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने

मुंबई : कोठडी मृत्यूप्रकरणात महाराष्ट्र आघाडीवर असल्याने, किरकोळ गुन्ह्यासाठी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची रात्री दहानंतर चौकशी न करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने बुधवारी पोलिसांना दिला, तसेच पुढील सहा महिन्यांत एकही कोठडी मृत्यू होणार नाही, याची काळजी घेण्याचा आदेशही उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला.गेल्या वर्षी दोन तरुणांचा कोठडी मृत्यू झाल्याने त्यांच्या नातेवाईकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. या याचिकेवरील सुनावणी न्या. व्ही. एम. कानडे व न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठापुढे होती.तीन वर्षांपेक्षा अधिक शिक्षा होऊ शकत नाही, अशा किरकोळ गुन्ह्यासाठी ताब्यात घेतलेल्या आरोपीची रात्री दहानंतर चौकशी करण्यात येऊ नये, असा आदेश खंडपीठाने पोलिसांना दिला.आरोपीला पोलीस स्टेशनमध्येच वकिलाचे सहाय्य हवे की नाही, याची विचारणा करावी, तसेच आरोपीला दंडाधिकाऱ्यांपुढे पहिल्यांदाच हजर केल्यानंतर त्यांनीही त्याला वकिलाचे सहाय्य हवे की नको, या विषयी विचारणा करावी, असा आदेश खंडपीठाने पोलिसांना आणि दंडाधिकाऱ्यांना दिला, तसेच कोठडी मृत्यू रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे आखण्यासाठी पोलीस महासंचालकांना तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती नेमण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले.बुधवारच्या सुनावणीदरम्यान राज्य सरकारतर्फे महाअधिवक्ता श्रीहरी अणे यांनी मुंबईच्या पोलीस स्टेशन्समध्ये प्रायोगिक तत्त्वावर २५ सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याची माहिती खंडपीठाला दिली. यापुढे टप्प्याटप्प्याने सर्व पोलीस स्टेशन्समध्ये सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. अणे यांनी खंडपीठाला सांगितले. (प्रतिनिधी) अ‍ॅग्नेलो वालद्रिस कोठडी मृत्यूप्रकरणअ‍ॅग्नेलो वालद्रिस याच्या कोठडी मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर आरोपपत्र दाखल करण्यास सीबीआय दिल्ली मुख्यालयाकडून परवानगी मिळाल्याची माहिती मुंबई सीबीआयने बुधवारी खंडपीठाला दिली.१५ एप्रिल २०१४ रोजी वडाळा रेल्वे पोलीस स्टेशनने अ‍ॅग्नेलो आणि अन्य तीन जणांना ६० हजारांची चेन चोरल्याप्रकरणी ताब्यात घेतले. कोठडीत या तिघांचाही शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या छळामुळे त्याचा १८ एप्रिल रोजी मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या वडिलांनी केला आहे. 2014 जूनमध्ये त्याचे वडील लिओनार्दो वालद्रिस यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. याचिकेवरील सुनावाणीवेळी खंडपीठाने मुंबई क्राईम ब्रँचच्या तपासावर अविश्वास व्यक्त करत, या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला.