लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बिहारचे राज्यपाल रामनाथ कोंविद यांना राष्ट्रपतीपदाची उमेदवारी देऊन भाजप सरकार दलित विरोधी असल्याचा प्रचार करणाऱ्या विरोधकांचे तोंड बंद करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी केले आहे. देशाच्या सर्वोच्च पदावर एका दलित व्यक्तींची निवड होत असून, विरोधकांनी विरोध करू नये, अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले येथे मांडली.येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘केंद्र सरकारने तीन वर्षांच्या काळात सर्व सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्यातील एक म्हणजे दलित समाजातील व्यक्तीला राष्ट्रपती पदासाठी संधी दिलेली आहे. कोविंद स्वच्छ प्रतिमेचे, कायदे पंडित व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना पुढे नेणारे दलित उमेदवार आहेत. शहा यांच्या निवड समितीने विचारपूर्वक कोविंद यांना उमेदवारी दिली आहे. एनडीएचा उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व पक्षांशी चर्चा करण्यात येणार आहे.’’ महाराष्ट्रातील सत्तेतील आमचे सहकारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मी स्वत: चर्चा करणार आहे. ठाकरे देखील एनडीएच्या उमेदवारास पांठिबा देतील, असा विश्वास आहे.
दलित व्यक्तीच्या निवडीला विरोध नको
By admin | Published: June 20, 2017 1:43 AM