शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

माझ्या वडिलांच्या मृत्यूचे राजकारण करू नका

By admin | Published: August 29, 2014 3:07 AM

माझ्या वडिलांना ज्यांनी जिवंतपणी यातना दिल्या, त्यांना आता त्यांच्या मृत्यूनंतर पुळका आला आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता अशा खोट्या पुळक्यांना बळी पडणार नाही

राजेश शेगोकार, बुलडाणामाझ्या वडिलांना ज्यांनी जिवंतपणी यातना दिल्या, त्यांना आता त्यांच्या मृत्यूनंतर पुळका आला आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणारी जनता अशा खोट्या पुळक्यांना बळी पडणार नाही. माझ्या वडिलांनी मला संघर्षाचा वारसा दिला असून, हा वारसा सांभाळण्यास माझे खांदे समर्थ आहे, अशी घणाघाती टीका भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा पंकजा मुंडे पालवे यांनी धनंजय मुंडे यांचे नाव न घेता गुरुवारी येथे केली. ‘लोकमत’मध्ये २४ आॅगस्ट रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांची मुलाखत प्रसिद्ध झाली होती. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती मृत्यूच्या चौकशीवर भाष्य करून, आंदोलनाची भाषा त्यांनी या मुलाखतीमध्ये होती. संघर्ष यात्रेच्या निमित्ताने पंकजा मुंडे यांनी त्यांना रोख-ठोक उत्तर दिले. बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथून पंकजा मुंडे यांनी संघर्ष यात्रेचा प्रारंभ केला. यावेळी झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस हे होते. व्यासपीठावर ज्येष्ठ नेते आ. भाऊसाहेब फुंडकर, भगवानगडाच्या प्रतिनिधी राधाताई सानप यांच्यासह डॉ.प्रितम व यशश्री मुुंडे, यात्रेचे समन्वयक सुजितसिंह ठाकूर उपस्थित होते. भर पावसातही प्रचंड गर्दी झालेल्या या सभेला पंकजा यांनी भावूक मार्गदर्शन केले. राज्यात महायुतीची सत्ता येण्याचे स्वप्न मुंडे साहेबांनी पाहिले होते. त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मी आता संघर्ष यात्रा सुरू केली आहे. आता त्याच भगवान गडावरून मला त्यांचे स्वप्न साकार होणार आहे, हे दिसत असून, त्यासाठीच ही संघर्ष यात्रा असल्याचे पंकजा यांनी सांगितले. पंकजा याच मुंडे साहेबांच्या खऱ्या वारसदार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.