बाबांनो, लोकांना भडकवू नका; अजित पवार वैतागले, राजकीय नेत्यांसह माध्यमांवर साधला निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 06:48 AM2022-04-18T06:48:36+5:302022-04-18T06:48:52+5:30
बारामती दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या सणात आनंदाने, उत्साहाने सहभागी झाले पाहिजे. एकोप्याने राहिले पाहिजे. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये.
बारामती : अरे बाबांनो, पत्रकारांनो आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनो, आज आपल्या राज्यात, देशात जे प्रश्न आहेत त्याला आपण महत्त्व देऊ, ते कसे सोडवता येतील ते पाहू. हे का उगीच जुन्या कुठल्या विषयांमध्ये लोकांना घेऊन त्यांच्या भावना कशा भडकावता येतील, संभ्रमावस्था कशी निर्माण करता येईल, हे काम करू नका. प्रसारमाध्यमांनीदेखील आता हे कमी करावे आणि विकासाच्या कामांना महत्त्व द्यावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांसह राजकीय नेत्यांवर निशाणा साधला.
बारामती दौऱ्यावर असणारे उपमुख्यमंत्री पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकमेकांच्या सणात आनंदाने, उत्साहाने सहभागी झाले पाहिजे. एकोप्याने राहिले पाहिजे. जाती-धर्मामध्ये तेढ निर्माण होईल असे वर्तन कोणाकडून होऊ नये.
माझ्या नावाने पावत्या फाडू नका
- जेम्स लेनने केलेल्या विधानावरून छेडले असता ते म्हणाले, मी याबाबत कोणतेही वक्तव्य केले नाही. तुम्ही कारण नसताना माझ्या नावाने पावत्या फाडू नका. सध्याच्या विकासाच्या कामांना व राज्यासमोर, देशासमोर असणाऱ्या प्रश्नांना महत्त्व द्या, असा सल्लादेखील त्यांनी दिला.
- सदावर्ते यांच्याबद्दल प्रश्न विचारणाऱ्या पत्रकाराला मध्येच थांबवत ते म्हणाले, माझ्याशी कामाचे बोला. मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो आहे.