मुंबई : विधान परिषदेत आमचे बहुमत आहे. आमच्या सहकार्यानेच तुम्हाला सभागृहाचे कामकाज चालवायचे आहे. त्यामुळे आवाज चढवू नका, विनंतीच्या भाषेत बोला. खडसे साहेब आपण सभागृहाचे नेते आहात त्यामुळे डोक्यावर बर्फ ठेवा. विरोधकांच्या भाषेत बोलू नका, अशा तिखट शब्दांतच राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी सत्ताधारी बाकावरील सदस्यांना खडसावत संख्याबळाची आठवण करून दिली.२०१५-१६च्या पुरवणी मागण्या सादर करत अध्यादेशही पटलावर ठेवला. सभागृहाचे कामकाज रेटून नेतानाच सत्ताधारी बाकावरून शेरेबाजी झाल्याने संतप्त झालेल्या तटकरे यांनी महसूल मंत्री एकनाथ खडसे आणि सहकार मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर थेट हल्ला चढविला. तर, सरकारला कामकाज रेटून नेता येणार नसल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
आवाज चढवू नका - तटकरे
By admin | Published: July 15, 2015 12:23 AM