कुठल्याही फॉर्मवर सही करू नका; अजित पवारांनी आमदारांना दिल्या सूचना, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2024 05:10 PM2024-01-31T17:10:07+5:302024-01-31T17:11:18+5:30

अजित पवार गटाच्या आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली.

Do not sign any form; Ajit Pawar gave instructions to MLAs, what happened? | कुठल्याही फॉर्मवर सही करू नका; अजित पवारांनी आमदारांना दिल्या सूचना, काय घडलं?

कुठल्याही फॉर्मवर सही करू नका; अजित पवारांनी आमदारांना दिल्या सूचना, काय घडलं?

मुंबई - Ajit Pawar in MLA Meeting ( Marathi News ) सध्या राष्ट्रवादी आमदार अपात्रतेबाबत महत्त्वाची सुनावणी सुरू आहे. त्यातच राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी समर्थक आमदारांची बैठक घेतली. या बैठकीत कुठल्याही फॉर्मवर सह्या करू नका अशी सूचना अजितदादांनी आमदार, मंत्र्यांना दिल्या आहेत. त्यामुळे अजित पवार गट अलर्ट मोडवर असल्याचे बोलले जाते. 

राज्यसभा निवडणुकीचे बिगूल वाजले असून याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानंतर अजित पवार गटाच्या आमदारांची उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर बैठक पार पडली. त्यात अजित पवारांनी आमदार, मंत्र्यांना कुणी कुठल्याही फॉर्मवर आणि पत्रावर सह्या करू नये अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. सूचक, अनुमोदक होऊ नये असं सांगण्यात आले आहे. मागील राज्यसभा निवडणुकीत राज्यात कशाप्रकारे काटे की टक्कर झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे या निवडणुकीत प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. त्यामुळे ही काळजी घेण्यात येत आहे. 

राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात महायुतीकडून अजित पवार गटाला १ जागा देण्यात येईल असं चित्र आहे. इतर ५ जागांवर भाजपासह शिवसेना लढवणार आहे. त्यामुळे १ जागा कोण लढवणार आणि या निवडणुकीत काय खबरदारी घ्यायची या सूचना देवगिरी बंगल्यावरील बैठकीत देण्यात आल्या. निवडणुकीत दगाफटका होऊ नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. अजित पवार गटाकडून उमेदवार कोण असेल त्याबाबत येणाऱ्या काळात निर्णय घेतला जाईल असं सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

भाजपाचं पुन्हा धक्कातंत्र

राज्यसभेच्या २७ फेब्रुवारीला होणाऱ्या निवडणुकीत मित्रपक्षांच्या मदतीने सर्व सहा जागा लढविण्याचा भाजपा विचार करत आहे. गेल्या वेळच्या राज्यसभा निवडणुकीप्रमाणे यावेळीदेखील धक्कातंत्राचा अवलंब करण्याची रणनीती आखली जात असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. मात्र, याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच होईल. सध्याच्या संख्याबळानुसार, भाजपाला तीन, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला एक आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एक अशा पाच जागा महायुतीला, तर एक जागा महाविकास आघाडीला मिळू शकते. मविआला दुसरी जागा निवडून आणण्यासाठी १५ मतांची गरज असेल, तर भाजपाला तिसरी जागा जिंकण्यासाठी शिंदे गटाची मदत लागेल. स्वतःची चौथी आणि महायुतीची सहावी जागा जिंकण्यासाठी भाजपला मेहनत करावी लागेल. मविआत फूट पाडून काही मते वळविल्यास ते भाजपाचे फार मोठे धक्कातंत्र असेल.
 

Web Title: Do not sign any form; Ajit Pawar gave instructions to MLAs, what happened?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.