शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
2
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
3
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
4
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
5
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
6
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
7
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
8
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
9
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
10
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
11
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
12
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
13
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
14
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
15
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
16
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
17
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
18
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
19
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
20
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट

वर्गीकरणांवर स्वाक्षरी करू नका

By admin | Published: June 09, 2016 12:46 AM

८५ कोटी रुपयांचा निधी परस्पर वळविण्यात आल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.

पुणे : स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा अश्विनी कदम यांच्या प्रभागातील ८५ कोटी रुपयांचा निधी परस्पर वळविण्यात आल्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. पक्षाच्या शहराध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली पक्षाच्या नगसेविकांनी बुधवारी सकाळी महापौर प्रशांत जगताप यांना घेराओ घातला. कदम यांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावावर महापौरांनी सह्या करू नयेत, अशी सूचना चव्हाण यांनी या वेळी महापौरांना केली.स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये १८१ कोटी रुपयांच्या वर्गीकरणाच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यामध्ये अश्विनी कदम यांना पूर्ण अंधारात देऊन अत्यंत नाट्यमयरीतीने त्यांच्या प्रभागातील ८५ कोटी रुपयांचा निधी परस्पर दुसऱ्या प्रभागात वळविण्यात आला. या पार्श्वभूमीवर वंदना चव्हाण, अश्विनी कदम, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नगरसेविका व पदाधिकाऱ्यांनी सकाळी प्रशांत जगताप यांची भेट घेतली. परस्पर निधी वळविण्याच्या प्रकाराबद्दल तीव्र शब्दांमध्ये नाराजी व्यक्त करण्यात आली. माजी महापौर चंचला कोद्रे या वेळी बोलताना म्हणाल्या, ‘‘स्मार्ट सिटीअंतर्गत बाणेर, औंध, बालेवाडी या भागांचा मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे. या भागाकरिता अंदाजपत्रकामध्ये ठेवण्यात आलेला निधी इतर भागांकडे वर्ग करण्यात यावा. मात्र महिला नगरसेविकांच्या प्रभागातील निधीचे वर्गीकरण होता कामा नये. महिलांबाबत मुद्दामहून असे निर्णय घेतले जात आहेत.’’स्थायी समितीमध्ये वर्गीकरणाच्या निर्णयाचा जाब विचारण्यासाठी वंदना चव्हाण यांच्यासह पक्षाच्या नगरसेविका सकाळी महापालिकेत आल्या असताना सभागृहनेते बंडू केमसे व स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके अनुपस्थित राहिले. महापौरांनी मात्र महिला नगरसेविकांच्या भावना जाणून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. (प्रतिनिधी)>कार्याध्यक्षांच्या घरी घेतली धावअजित पवार यांच्या बैठकीला अनुपस्थित राहिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी निरोप मिळाला नसल्याचे उत्तर दिले होते. मात्र त्यांना बैठकीचे निमंत्रण देऊनही त्यांनी असे उत्तर का दिले, याचा जाब विचारण्यासाठी शहराध्यक्षा वंदना चव्हाण यांच्यासह महिला नगरसेविकांनी बुधवारी पाटील यांच्या घरी धाव घेतली. मात्र त्यांची श्रीकांत पाटलांशी भेट होऊ शकली नाही.>महिला यापुढे अन्याय सहन करणार नाहीत‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये महिलांना आदर, सन्मान दिला जातो, म्हणून आम्ही या पक्षात आलो आहोत. महिला नगरसेविका व पदाधिकारी यापुढे त्यांच्यावर होणारा अन्याय सहन करणार नाहीत. अश्विनी कदम यांच्या प्रभागातील काही निधी मागासवर्गीय योजना व महिलांसाठी देण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र सभागृहनेत्यांनी कोणाशीही चर्चा न करता कदम यांना अंधारात ठेवून त्यांच्या निधीचे वर्गीकरण केले. याविरोधात सर्व महिला एकत्र आल्या असून यापुढे आम्ही अन्याय सहन करणार नाही.’’- खासदार वंदना चव्हाण, शहराध्यक्षा, राष्ट्रवादी काँग्रेस