शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

विमानतळाला परस्पर कोणीही पाठिंबा देऊ नका

By admin | Published: September 22, 2016 2:07 AM

प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बरोबर राहून विरोध करावा.

राजेवाडी : राजेवाडी वाघापूर येथे होणाऱ्या प्रस्तावित विमानतळाला विरोध करण्यासाठी तालुक्यातील शेतकरी संघटनांनी व लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांच्या बरोबर राहून विरोध करावा. परस्पर कोणीही या विमानतळाला पाठिंबा देऊ नये; अन्यथा रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा वाघापूरचे माजी सरपंच बाजीराव कुंजीर व पुरंदर तालुका युवक काँग्रेस पक्षाचे माजी अध्यक्ष गणेश मेमाणे यांनी दिला आहे.जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरंदरमधील विमानतळाच्या जागेला पसंती दिली असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना यामध्ये भागीदार करणार असल्याचे सांगितले असले, तरी या भागातील ज्यांच्या जमिनी जाणार आहेत, त्यांना अजिबात साधी विचारपूस न करता परस्पर निर्णय घेतला असल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत विमानतळाला तीव्र विरोध करण्याची तयारी ग्रामस्थांनी केली असून, यापुढे पाहणी करण्यासही विरोध केला जाईल. (वार्ताहर)>मोजणीला विरोधविमानतळ झाल्यास राजेवाडी-वाघापूर परिसर भकास होऊन तालुक्यातील पुढाऱ्यांच्या शेकडो एकर जमिनी असल्याने त्यांच्या जमिनीला बाजार येणार आहे. आमच्या झोपा उडवणाऱ्यांना आम्ही झोप येऊन देणार नसल्याचे राजेवाडीतील महिलांनी सांगितले. मोजणीलाही विरोध करण्यात येईल.