"आर. आर. पाटलांना परदेशात नेऊ नका, कारण ते..."; भर सभेत अजित पवार बोललेले, आव्हाडांनी आठवण करून दिली

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2023 06:57 PM2023-12-07T18:57:20+5:302023-12-07T18:57:36+5:30

विधानसभेतील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला दिल्यावरून आव्हाड यांनी टीका केली आहे. लोकांना शरद पवारांकडून सर्व काही हिसकावून घ्यायचे आहे.

"Do not take R. R. Patils to abroad, because they...''; Ajit Pawar spoke in the ralley, Jitendra Awhad reminded | "आर. आर. पाटलांना परदेशात नेऊ नका, कारण ते..."; भर सभेत अजित पवार बोललेले, आव्हाडांनी आठवण करून दिली

"आर. आर. पाटलांना परदेशात नेऊ नका, कारण ते..."; भर सभेत अजित पवार बोललेले, आव्हाडांनी आठवण करून दिली

अजित पवार आणि शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात वैयक्तीक टीका सुरु झाली आहे. सुटलेल्या पोटावरून सुरु झालेले शाब्दिक वॉर आता एकमेकांचे जुने प्रसंग काढण्यास सुरुवात झाली आहे. अदित पवार गटातील नेत्याने आव्हाड हे राजकारणातील राखी सावंत असल्याची टीका केली आहे. तर आव्हाडांनी अजित पवारांनी आर आर पाटलांचा भर सभेत केलेला अपमानाचा प्रसंग उकरून काढला आहे. 

विधानसभेतील राष्ट्रवादीचे कार्यालय अजित पवार गटाला दिल्यावरून आव्हाड यांनी टीका केली आहे. लोकांना शरद पवारांकडून सर्व काही हिसकावून घ्यायचे आहे. कधी म्हणतात शरद पवार त्यांच्यासाठी देव आहेत, मग कोणी देवळातून बाहेर पडते का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दैवत शरद पवार आहेत आणि आम्ही आमच्या पक्ष कार्यालयाची मंदिराप्रमाणे पूजा करतो. आज त्याच दैवत शरद पवारांना पक्ष कार्यालयाबाहेर फेकले जात आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकेकाळी सत्तेत होते आणि विरोधी पक्षातही होते. सध्या ज्या पक्षांसोबत एकनाथ शिंदे आहेत, त्या पक्षांच्या सत्तेत असताना शिंदे यांनी चहा पिण्यावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे जनतेला फसवू नका आणि त्याबद्दल पण सांगा, असे आव्हान आव्हाड यांनी शिंदेंना दिले आहे. नीलम गोऱ्हे यांना उद्धव ठाकरेंमुळेच एवढी पदे मिळाली आणि आज नीलम गोर्‍हे उद्धव यांना टोमणे मारत आहेत, असेही आव्हाड म्हणाले. 

अजित पवारांना लोकांकडे बोटे दाखवायची सवय आहे. आर. पाटील कुठेही थुंकतात, त्यांना परदेशात नेऊ नका कारण ते तिथेच थुंकतील. आबांना परदेशात घेऊन जाणे योग्य नाही, असे अजित पवार यांनी भर सभेत म्हटले होते. 35 वर्षांच्या राजकारणात मी त्यांना एकदाही परदेशात नेले नाही, असे पवार म्हणाले होते, असे अजित पवार म्हणाले. 

पवारांवर भाष्य करा, पण अजित पवारांना प्रत्येकावर वैयक्तिक कमेंट करायची सवय आहे. अजित पवार शरद पवारांच्या सोबत एकाच पक्षात होते. तेव्हा मीही एकदा अजित पवारांवर भाष्य केले होते. पण आता अजित पवार वेगळे झाले आहेत.   तुम्ही माझ्यावर वैयक्तिक टिप्पणी केलीत तर मी त्याला नक्कीच प्रत्युत्तर देईन, असा इशाराही आव्हाड यांनी दिला. 
 

Web Title: "Do not take R. R. Patils to abroad, because they...''; Ajit Pawar spoke in the ralley, Jitendra Awhad reminded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.