शहरं
Join us  
Trending Stories
1
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
2
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमानात
4
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
5
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
6
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
7
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
8
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
9
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
10
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
11
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
12
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
13
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
14
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
15
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
16
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
17
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
18
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
19
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
20
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल

माझी प्रकृती उत्तम, अफवांवर विश्वास ठेऊ नका - शरद पवार

By admin | Published: January 26, 2016 12:14 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याचे वृत्त सोशल मीडियावर व्हायरल झाले. पण आपण ठणठणीत असून अफवांवर विश्वास ठेऊ नका असे खुद्द पवारांनींच स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २६ - प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्याच्या रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल आज सकाळपासून सोशल मीडियावर उलट-सुलट अफवा पसरत होत्या.  मात्र ' माझी प्रकृती अतिशय उत्तम असून मी ठणठणीत आहे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका' असे खुद्द शरद पवार यांनीच स्पष्ट केल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
शरद पवार यांना अतिश्रमामुळे थकवा आल्याने त्यांना रविवारी दुपारी रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती बरीचशी सुधारली. खुद्द पवार यांनी कालच ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रकृती ठीक असल्याचे स्पष्ट करत सर्व पाठिराख्यांचे सदिच्छांसाठी आभार मानले होते. मात्र तरीही आज सकाळपासून त्यांच्या प्रकृतीबद्दल पुन्हा उलटसुलट बातम्या ऐकू लागल्या. व्हॉट्सअॅप आणि सोशषल मीडियाच्या इतर माध्यमांतून ते वृत्त व्हायरल झाले होते. अखेर पवार यांनीच या वृत्ताचे खंडन केले असून त्यांच्या डॉक्टरांनीही त्यांची प्रकृती आता ठणठणीत असल्याचे सांगत त्यांचे सर्व रिपोर्ट्सही नॉर्मल असल्याचे स्पष्ट केले. तसेच उद्या दुपारपर्यंत त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, असेही डॉक्टरांनी सांगितले.