शहरं
Join us  
Trending Stories
1
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
2
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
3
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
4
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
6
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
7
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
8
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेटपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
9
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
10
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
11
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
12
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
13
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
14
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
15
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल
16
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
17
फक्त या ४ गोष्टी वर्ज्य करून गायकानं घटवलं १३० किलो वजन, ट्रान्सफॉर्मेशन पाहून व्हाल हैराण
18
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
19
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
20
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योगगुरूंनीच सांगितलं...

‘हेरिटेज’ म्हणून कवटाळू नका

By admin | Published: June 17, 2016 3:00 AM

मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ वांद्रे-कुर्ला संकुलात स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला काही वकिलांनी विरोध केल्याने उच्च न्यायालयाने वकिलांनाच खडसावले. उच्च न्यायालयाची इमारत हेरिटेज

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ वांद्रे-कुर्ला संकुलात स्थलांतरीत करण्याच्या निर्णयाला काही वकिलांनी विरोध केल्याने उच्च न्यायालयाने वकिलांनाच खडसावले. उच्च न्यायालयाची इमारत हेरिटेज आहे म्हणून कवटाळत बसू नका. आता पुढे जाण्याची वेळ आली आहे. पक्षकारांची आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे, हे लक्षात घ्या. सरकारने हा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यामुळे वकिलांनी यात खोडा घालू नये, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने वकिलांना खडसावले. फोर्ट येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या हेरिटेज इमारतीची जागा कामकाजासाठी अपुरी असल्याने लवकरात लवकर उच्च न्यायालयाचा कारभार वांद्रे- कुर्ला संकुलनात स्थलांतरीत करण्यात यावा, अशी मागणी व्यवसायाने वकील असलेल्या अहमद अब्दी यांनी जनहित याचिकेद्वारे केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. अमजद सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती. गुरुवारच्या सुनावणीत अ‍ॅड. आर. जयकर यांनी मध्यस्थी अर्ज करत उच्च न्यायालयाचा कारभार वांद्रे - कुर्ला संकुलात स्थालंतरीत करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती उच्च न्यायालयाला केली.ही इमारत पुरातन वास्तू असल्याने या इमारतीला वेगळादर्जा लाभला आहे. तसेच यापरिसरात अनेक वकिलांची कार्यालये आहेत. तसेच वकिलांना व पक्षकारांना हे ठिकाण सोयीचे आहे. त्यामुळे येथील कामकाज वांद्रे- कुर्ला संकुलात स्थलांतरीत करण्यात येऊ नये, असा युक्तिवाद मध्यस्थीच्यावतीने ज्येष्ठ वकील जनक द्वारकादास यांनी केला.त्यावर खंडपीठाने नाराजी दर्शवली. उच्च न्यायालयाने या याचिकेवरील पुढील सुनावणी ३० जून रोजी ठेवली आहे. (प्रतिनिधी) विचार बदलण्याची वेळ आली आहे- ‘बरीच वर्ष पाठपुरावा केल्यानंतर राज्य सरकार उच्च न्यायालयासाठी बीकेसीत (वांद्रे - कुर्ला संकुल) भूखंड देण्यास तयार झाले आहे. आता यामध्ये वकिलांनी खोडा घालू नये. उच्च न्यायालयाचा कारभार दिवसेंदिवस वाढत आहे. ही जागा (फोर्ट येथील इमारत) कमी पडत आहे. पक्षकारांना बसण्यासाठी जागा नाही. तसेच पिण्याचे पाणी, शौचालये इत्यादी सुविधा अपुऱ्या पडत आहे. आमच्या चेंबर्सची जागाही कमी करण्यात येत आहे. कर्मचारी याचिकांच्या ढिगाखाली काम करत आहेत. जागेअभावी प्रचंड गैरसोय होत आहे. वकिलांनी केवळ त्यांची सोय बघू नये. उच्च न्यायालयाची इमारत आणि वकिलांचे विचार बदलण्याची वेळ आली आहे,’ अशा शब्दांत उच्च न्यायालयाने वकिलांना खडसावले.