रूपेश उत्तरवार ल्ल यवतमाळ
दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा, असे म्हणत पारंपरिक पद्धतीने दीपावली उत्सव साजरा करताना फटाक्यांची आतशबाजी ओघाने आलीच़ मात्र, पर्यावरणातील वाढते प्रदूषण पाहता बच्चे कंपनीमध्ये जनजागृती अभियान राबविण्याचा निर्णय यवतमाळ जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने घेतला आह़े ‘फटाके नकोत, पुस्तके हवीत’ हे अभियान राबवून फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आह़े
यवतमाळ जिल्ह्यातील शाळांना 4 हजार पत्रे पाठविण्यात आली आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा पर्यावरणपूरक उपक्रम राज्यापुढे आदर्श निर्माण करणारा आहे. दिवाळीत फटाक्यांवर होणारा व्यर्थ खर्च टाळा आणि त्या पैशांत पुस्तके घ्या. आपल्याला आवडणारी पुस्तके विकत घेण्याचा संदेश देण्यात आला आहे. या पत्रत गतवर्षी जिल्ह्यातील निंभा गावात फटाके फोडताना झालेल्या अपघाताचा उल्लेख करण्यात आला आहे. फटाके न फोडल्यास असे अपघात टाळता येतील. सोबतच पर्यावरणाची होणारी मोठी हानी टाळता येईल, असा उल्लेख पत्रत आहे.
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्यासाठी हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याबाबत जाणीव जागृतीसाठी चार हजार पत्रे स्वाक्षरीनिशी शाळांना पाठविण्यात आली आहेत. या माध्यमातून मुलांमध्ये चांगले विचार रूजविण्याचा प्रयत्न केला जाईल़
- सुचिता पाटेकर,
प्रभारी प्राथमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ