ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - आपल्या दैनंदिन वापरात स्मार्ट फोन हा महत्वाचा घटक आहे. आपल्या व्यवसाय, नोकरीच्या दैनंदिन गरजांची पूर्ती करण्यासाठी, तसेच शिक्षण, मनोरंजनासाठी व आप्तेष्टांशी संवादासाठी स्मार्ट फोन अत्यंत उपयुक्त आहे. प्रत्येक ठिकाणी स्मार्ट फोन आपल्या सोबतचं असतो. प्रवास करताना मनोरंजन करण्यासाठी अथवा आपला वेळ घालवण्यासाठी अधिक वापर होतो. इंटरनेटचा अधिक वापर केला असता मोबईलची बॅटरी लवकर कमी होत असल्याचे आपल्यला जाणवते. स्मार्ट फोनची बॅटरी वाचवण्यासाठी काही टिप्स आहेत. त्या जर तुम्ही आमलात आणल्यास बॅटरी वाचवाण्यासाठी फायदा होईल.
ब्राइटनेस कमी ठेवा
स्मार्ट फोनचा नेहमी ब्राइटनेस कमी ठेवा. जेणेकरुन त्याचा डोळ्याला त्रास होणार नाही आणि बॅटरी वाचण्यासही मदत होइल. (ब्राइटनेस कमी करण्यसाठी > Settings > Display > Brightness level) ऑटो ब्राइटनेस या फिचरला ऑफ करुन बॅटरी वाचवली जाईल.
१५ सेंकद ऐवढ्या टाईमवर मोबाईल स्क्रिन ऑफ होण्याची वेळ ठेवा. साधारण प्रत्येकाच्या मोबाइलची स्क्रिन ऑफचा टाईम हा ३० सेंकद किंव्हा त्यापेक्षा अधिक असतो.
मोबईलमध्ये असणारे अॅप किती बॅटरी वापरतात हे आपल्याला माहीत नसते त्यामुळे अनावश्यक अॅप काढून टाका. त्याचप्रमाणे Settings > Battery मध्ये पाहिल्यास कोणता अॅप किती बॅटरी वापरतो हे समजते. जो अॅप बॅटरी जास्त बापरतो त्या अॅपचा वापर कमी करा.
फोनची बॅटरी कमी होत असल्यास बॅटरी सेव्ह मोड ऑन करावा. काही स्मार्ट फोनमध्ये पावर सेव्ह हे फिचर असते ते ऑन कराव. एंड्रॉइडच्या लॉलीपॉप स्मार्टफोनमध्ये हे फिचर इनबिल्ट आहे. (Settings > Battery > Battery Saver)
स्मार्ट फोनमध्ये दोन प्रकारचे डिस्प्ले असतात. LCD आणि AMOLED. यामधील AMOLED अतिरिक्र बॅटरी वापरतो. जर आपल्या फोनमध्ये AMOLED डिस्प्ले असेल(सॅमसंगच्या प्रत्येक एंड्रॉइड मध्ये राहतो) त्यावेळी आपल्या मोबाईलचा वालपेपर हा डार्क अथवा ब्लॅक वापरा. जेणेकरुन बॅटरी अधिक प्रमाणात वापरता येइल.
सर्वात म्हत्वाचे - आपण एखाद्या कामात किव्हा मिंटीग मध्ये असेल त्यावेळी आपला मोबाईल व्हायब्रेट मोड वर ठेवतो. पण व्हायब्रेट मोड वर असल्यास मोबईलची बॅटरी अधिक प्रमाणात वापरली जाते. अशा वेळी आपला मोबईल सायलंट (मौन) करा. Dial pad tones, Screen locking sounds, Touch sounds हे फिचर देखिल सायलंस(मौन) ठेवा. आपली बॅटरी नक्कीच सेव्ह होण्यास मदत होइल.