मार्गासनी : वेल्हे तालुक्यात जिल्हा परिषदेकडून विविध कामांमध्ये निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, जिल्हा प्रशासनाने चौकशी करावी, अशी मागणी वारंवार करून कारवाई होत नसल्याने एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण व मोर्चा काढणार असल्याचे जिल्हा परिषद माजी सदस्य रेवणनाथ दारवटकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याबाबतचे निवेदन त्यांनी नुकतेच जिल्हाधिकारी सौरभ राव व तहसीलदार डॉ. वनश्री लाभशेटवार यांना दिले आहे.या निवेदनात म्हटले आहे, की मागील सहा महिन्यांपासून वेल्हे तालुक्यातील झालेल्या विकासकामाची चौकशी करावी, असे लेखी निवेदन अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले होत. तसेच या कामाची चौकशी करावी, अशी मागणी वारंवार लेखी व तोंडीदेखील केली होती. परंतु याबाबत अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. तालुक्यामध्ये नळ पाणीपुरवठा योजना, रस्ते, शाळा दुरुस्ती, शौचालये, घरकुल योजना आदीसंदर्भातील कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. अकरा गावांत भीषण पाणीटंचाई असूनदेखील एकही टँँकर सुरू झाला नाही. यामुळे २७ मे रोजी तहसील कार्यालय, पोलीस स्टेशनसमोर उपोषण केले जाणार असून मोर्चा काढणार असल्याचे या वेळी सांगितले.
निकृष्ट कामांची चौैकशी करा
By admin | Published: May 20, 2016 2:13 AM