शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

डॉक्टरचा पत्नीवर कोयत्याने हल्ला

By admin | Published: August 19, 2015 1:16 AM

पत्नीचे परिसरातील इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका डॉक्टरनेच पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री चेंबूर येथे घडली

मुंबई : पत्नीचे परिसरातील इसमासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका डॉक्टरनेच पत्नीवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना रविवारी रात्री चेंबूर येथे घडली. यामध्ये पत्नीसह मुलगादेखील जखमी झाला असून, दोघांवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नवेंद्र सोनावणे (३७) असे या आरोपी डॉक्टरचे नाव असून, तो चेंबूरच्या खारदेव नगर येथे कुटुंबासह राहतो. या परिसरात त्याचा होमिओपॅथी दवाखाना आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून त्याचे पत्नीसोबत वाद सुरू होते. पत्नीचे परिसरातील एका इसमासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय त्याला होता. त्यामुळे नेहमीच तो पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करीत होता. रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो दवाखान्यातून घरी आल्यानंतर कुटुंब गाढ झोपेत असताना त्याने पुन्हा पत्नीला मारहाणीस सुरुवात केली. काही वेळानंतर त्याने घरातील कोयता घेऊन पत्नीच्या डोक्यावर दोन वार केले. तिचा आरडाओरडा ऐकून मुलगा आईला वाचवण्यासाठी धावून आला. आरोपीने त्याच्या हातावरदेखील एक वार केला आहे. त्यानंतर परिसरातील रहिवाशांनी मुलाला आणि पत्नीला गोवंडीच्या शताब्दी रुग्णालयात दाखल केले. गोवंडी पोलिसांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज सकाळी या आरोपीला अटक करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)