शहरं
Join us  
Trending Stories
1
राजीनामा देण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दोन दिवसांचा वेळ का घेतला? मंत्री आतिशी यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"मोदी येणार म्हणून सरन्यायाधीशांनी गणपतीला पुढची तारीख..."; ठाकरेंचा चंद्रचूड यांना टोला
3
“जुनी पेन्शन योजना बंद करण्याचे पाप भाजपा सरकारचे, काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा लागू करू”
4
48 तासांचं रहस्य काय...? तत्काळ राजीनामा न देण्यावरून भाजपचा केजरीवालांवर निशाणा
5
“२२ वर्षे आमदार, ८४ हजार पेन्शन, मोदी घरी बसले असते तर...”: ठाकरे गटाचे नेते थेट बोलले
6
नितीन गडकरींनी केला गौप्यस्फोट; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "ते पंतप्रधान झाले तर..."
7
धक्कादायक! एका आठवड्याभरात तब्बल १९ हत्या; 'या' देशात घडला थरकाप उडवणारा प्रकार
8
जय श्रीराम! १८० दिवसांत ११ कोटी भक्तांनी घेतले रामललाचे दर्शन; ३३ कोटी पर्यटकांची युपीला भेट
9
मुंबईत पुन्हा हिट अँड रन; दहिसरमध्ये भरधाव कारमुळे १७ वर्षीय तरुणाचा मृत्यू; एक जखमी
10
Adani Group ला महाराष्ट्रात पुन्हा मिळाला मोठा प्रकल्प! 4 कंपन्यांना धोबीपछाड देत जिंकली बोली
11
अमेरिकेतून ऑर्डर मिळताच या ₹25 च्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या! देतोय बंपर परतावा
12
भाजपला विधानसभा निवडणुकीआधी विदर्भात धक्का! गोपालदास अगरवाल पुन्हा काँग्रेसमध्ये
13
"जनता आपल्या हातावर, मेरा केजरीवाल...", राघव चड्ढांकडून दीवार चित्रपटातील डॉयलॉगचा उल्लेख!
14
अरविंद केजरीवालांनी राजीनामा दिल्यास दिल्लीचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? 'ही' ५ नावं आघाडीवर...
15
आधी नोटीस, नंतर उचलबांगडी! HAS अधिकारी ओशिन शर्मा का आल्या इतक्या चर्चेत?
16
मंगळवारी अनंत चतुर्दशी: बाप्पाचे विसर्जन करणे योग्य की अयोग्य? शास्त्र काय सांगते? वाचा
17
अनंत चतुर्दशी: शेषशायी विष्णूंचे दर्शन; ४०० वर्षांचा इतिहास, दृष्टांत झाला अन् अनंत प्रकटला
18
अनंत चतुर्दशी: व्रत शक्य नाही? १५ मिनिटांत होणारे प्रभावी स्तोत्र म्हणा, पूर्ण पुण्य मिळवा
19
अनंत चतुर्दशी: ‘अशी’ करा गणपतीची उत्तरपूजा; पाहा, विसर्जन विधी, मंत्र अन् प्रार्थना
20
अरविंद केजरीवाल यांच्या राजीनाम्यानंतर सरकार कोण चालवणार? कायदा काय सांगतो? पाहा...

डॉक्टर महिलेवर क्लिनिकमध्ये अतिप्रसंगाचा प्रयत्न

By admin | Published: July 24, 2016 8:51 PM

डॉक्टर महिलेचा पाठलाग करणाऱ्या एका नराधमाने चक्क तिच्या क्लिनिकमध्ये जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला.

ऑनलाइन लोकमत

औरंगाबाद, दि. 24 - डॉक्टर महिलेचा पाठलाग करणाऱ्या एका नराधमाने चक्क तिच्या क्लिनिकमध्ये जाऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना २३ जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पडेगाव येथील गोल्फ क्लबजवळ घडली. पोलिसांनी याप्रकरणी अफरोज अब्दुल रहेमान कुरेशी (रा. शहागंज) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी सांगितले की, ३२ वर्षीय पीडिता डॉक्टर महिलेचा पडेगाव येथे दवाखाना आहे. अफरोज आणि ती एकमेकांच्या ओळखीचे आहेत. तो सहा ते सात महिन्यांपासून तिचा सतत पाठलाग करीत होता. तिला फोन करणे, मेसेज पाठविणे तर त्याचे नित्याचेच झाले होते. त्याचा दुष्ट हेतू लक्षात येताच पीडितेने त्याची समजूत काढून यापुढे मला तुझ्यासोबत बोलायचे नाही, असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र, तो ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. त्यानंतरही तो तिच्या मागावरच राहत होता. २३ जुलै रोजी दुपारी पीडिता तिच्या दवाखान्यात एकटी बसलेली असताना तो तेथे गेला. यावेळी त्याने तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न करून क्लिनिकची तोडफोड केली. तिला जिवे मारण्याची धमकी देऊन मारहाण केली. तिने आरडाओरड केल्यानंतर परिसरातील लोक जमा झाले. कोणी तरी छावणी पोलिसांना घटनेची माहिती दिली. लोक जमा होत असल्याचे पाहून तो तेथून पसार झाला. या घटनेनंतर पीडितेने अफरोजविरोधात छावणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, उपनिरीक्षक रेश्मा सौदागर तपास करीत आहेत.