शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसची १६ जणांची तिसरी उमेदवार यादी जाहीर; मुंबईतील २ मतदारसंघाचा समावेश
2
पुण्यात भाजपाला बसणार मोठा फटका?; कसबा पेठ उमेदवार निवडीवरून पसरली नाराजी
3
दहिसर मतदारसंघात ठाकरेंचा ट्विस्ट; आधी तेजस्वी घोसाळकरांना उमेदवारी, पण आता...
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: तिकिट कापल्याने भाजपा आमदाराला अश्रू अनावर
5
शिंदेंच्या शिवसेनेत गेलेल्या बच्चू कडूंच्या आमदाराचा महायुतीत पत्ता कट
6
NCP नेते बाबा सिद्दीकी हत्याकांडात नवा खुलासा; हत्येआधी शूटरच्या संपर्कात अन्...
7
मनसेची १५ उमेदवारांची पाचवी यादी जाहीर; सोलापूर, कोल्हापूर, बीडमध्ये कोणाला संधी?
8
नवाब मलिक मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघात लढणार; भाजपा काय भूमिका घेणार?
9
कोरेगावची जागा राष्ट्रवादीला दिली, सातारा मतदारसंघातून ठाकरे गट लढणार; संजय राऊतांची माहिती
10
अपक्ष आमदार किशोर जोरगेवार भाजपात प्रवेश करणार; सुधीर मुनगंटीवारांची नाराजी दूर?
11
गौतम गुरुजींचं नशीब फुटकं! आधी खेळाडू अन् आता कोचिंगमध्ये टीम इंडियावर आली 'गंभीर' वेळ
12
Harun Khan: ठाकरेंनी उतरवला अल्पसंख्याक उमेदवार, कोण आहेत हारुन खान?
13
Sanjay Singh : "भाजपाने केला केजरीवालांना मारण्याचा प्रयत्न, द्वेषाच्या राजकारणाने..."; आप नेत्याचा गंभीर आरोप
14
'बटेंगे तो कटेंगे': भाजपच्या भूमिकेवर RSS चं पहिल्यांदाच भाष्य; होसबळे म्हणाले...
15
नेत्रदिपक कामगिरी! CA चं शिक्षण घेतल्यानंतर 'तो' शेतीकडे वळला; आता ५५ लाखांचा टर्नओव्हर
16
बंडोबा झाले थंड! उल्हासनगरमध्ये आयलानी व कलानी लढतीकडे सगळ्यांचे लक्ष का?
17
"आम्हाला टोलमाफीचे गाजर नको", सुमीत राघवनचा संताप, शिंदे-फडणवीसांना टॅग करत म्हणाला...
18
नेटकऱ्यांनी रोहित-विराटला दाखवला 'आरसा'; सचिनच्या चाळीशीतील 'त्या' व्हिडिओचाही दिला दाखला
19
मोठी बातमी: भाजपची दुसरी उमेदवार यादी जाहीर; जतमधून पडळकर, खडकवासल्यातून पुन्हा तापकीर!
20
पोटनिवडणुकीत पराभव तरी भाजपने दिली पुन्हा संधी! हेमंत रासनेंनी कसं जुळवलं गणित?

डॉक्टर संपावर; रुग्ण वाऱ्यावर, शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे राज्यात पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2022 7:39 AM

Doctor Strike: वैद्यकीय शिक्षण सचिव विजय सौरभ यांनी राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला गुरुवारी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे पडसाद शुक्रवारी राज्यात उमटले.

मुंबई : वैद्यकीय शिक्षण सचिव विजय सौरभ यांनी राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या शिष्टमंडळाला गुरुवारी दिलेल्या अपमानास्पद वागणुकीचे पडसाद शुक्रवारी राज्यात उमटले. बहुतांश शासकीय रुग्णालयातील २ हजार २२० डॉक्टरांनी काम बंद ठेवत आंदोलन केल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली होती. संघटनेच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही दिला.विजय सौरभ यांनी ‘बास्टर्ड, गेट आउट, आय विल सी यू....’अशा प्रकारची भाषा वापरल्याने डॉक्टरांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. डॉक्टरांना वरिष्ठ अधिकाऱ्याकडून अशाप्रकारे अश्लाघ्य भाषेत सुनावले जात असेल तर आम्ही कदापि सहन करणार नाही, असे सांगत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही डॉक्टरांनी केली आहे. 

१८व्या दिवशीही सहायक प्राध्यापकांच्या आंदोलनाची दखल नाहीn नोकरीमध्ये कायम करावे, वेतनवाढ, हक्काच्या सुट्या मिळाव्यात, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील २२ वैद्यकीय महाविद्यालयांतील सहायक प्राध्यापक जे. जे. रुग्णालयात साखळी उपोषणाला बसले आहेत. n मात्र, त्यांच्याकडे सरकारकडून दुर्लक्ष करण्यात येत असून, १८ वा दिवस उलटूनही त्यांच्या उपोषणाची दखल घेतली न गेल्याने ते व्यथित झाले आहेत. n शुक्रवारी जे. जे. रुग्णालयातील २७० सहायक प्राध्यापकांनी एका दिवसाची रजा टाकून आंदोलन केले. 

n विदर्भात महाराष्ट्र स्टेट मेडिकल टीचर्स असोसिएशनच्या यवतमाळ शाखेने बंद पाळत केवळ आकस्मिक सेवा दिली. n गोंदियातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरही संपावर होते. चंद्रपुरात घटनेचा निषेध नोंदवत डॉक्टरांनी सेवा दिली. अकोल येथील ‘जीएमसी’चे १३० प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने रुग्णसेवा विस्कळीत झाली. 

६७ डॉक्टर संपावरअंबाजोगाई येथील स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयातील ६७ डॉक्टरांनी शुक्रवारी सामूहिक रजा आंदोलन करून महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षक संघटनेने याबाबत अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे यांना निवेदनही दिले. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व सेवा थांबविल्या होत्या. 

प्रशासनाविरोधात घोषणाबाजीजळगाव येथे प्राध्यापकांनी निर्दशने करीत प्रशासनाच्या अरेरावीविरोधात घोषणाबाजी केली आणि अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांना निवेदनदेखील दिले. पुण्यातील ससून रुग्णालयातील सेवाही विस्कळीत झाली होती.

 

टॅग्स :doctorडॉक्टरMaharashtraमहाराष्ट्र