नांदगाव (नाशिक) : डॉक्टरच्या मुलीला एमबीबीएससाठी प्रवेश मिळवून देतो म्हणून चाळीस लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार व त्याचा अन्य साथीदार फरार आहे. डॉ. सुनील तुसे यांची मुलगी सुजाताला नवी मुंबइतील तेरणा महाविद्यालयात एमबीबीएसला प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी तुसे हे नेरूळ येथील महाविद्यालयात ९ आॅगस्टला गेले होते. तेथे तुसे यांची प्रशांत पटनाईकशी भेट झाली. भेटीत तुसे यांना प्रवेशासाठी तुम्हाला रोख रक्कम द्यावी लागणार नाही तसेच माझे व तेरणा पब्लिक चॅरिटीबल ट्रस्टचे संयुक्त खाते असल्याने त्यावर सुरुवातीला ९२ हजार भरून नंतर चार टप्प्यात दहा लाख रु पये भरा, असे तुसे यांना पटनाईकने सांगितले. त्यानुसार डॉ. तुसे यांनी पैसे भरले. मात्र पटनाईक यांनी अॅक्सिस बँकेचा तुसेना दिलेला ४० लाखांचा धनादेश वटू शकला नाही.त्यामुळे तुसे यांनी पोलिसांत तक्रार दिली. बुधवारी पहाटे नवी मुंबईत गौतम लोखंडे व प्रशांतचा भाऊ प्रदीप पटनाईक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. (वार्ताहर)
डॉक्टरला ४० लाखांना फसविले
By admin | Published: December 22, 2016 3:46 AM