मुंबई : मूल होत नसलेल्या दाम्पत्याला कृत्रिमरीत्या गर्भधारणेची हमी देणाऱ्या डॉक्टर दाम्पत्याचा परवाना निलंबित करण्याच्या आदेशाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. या दाम्पत्याचे आयव्हीएफ क्लिनिक दक्षिण मुंबईमध्ये आहे. डॉ. अनिरुद्ध मालपानी व त्यांची पत्नी अंजली गर्भधारणा न होणाऱ्या दाम्पत्यांना कृत्रिमरीत्या गर्भधारणेची हमी देत आणि न झाल्यास पैसे परत करण्याचे आश्वासनही दाम्पत्यांना देत. त्यांनी यासंबंधीची सर्व माहिती संकेतस्थळावर उपलब्ध केली होती. त्यांच्या या जाहिरातीविरुद्ध अॅडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल आॅफ इंडियाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियात (एमसीआय) तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत एमसीआयने डॉक्टर दाम्पत्याचा तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला. तसेच परवाना कायमचा रद्द करण्याचा इशाराही एमसीएने त्यांना दिला.एमसीएच्या या निर्णयाला डॉक्टर दाम्पत्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले. याचिका प्रलंबित असेपर्यंत परवाना निलंबनाच्या आदेशाला स्थगिती द्यावी, अशी मागणी डॉक्टरांनी याचिकेत केली आहे. या बाबतीत आम्ही तज्ज्ञ नाही. त्यामुळे आम्ही या ‘संवेदनशील आणि नाजूक’ विषयावर काही बोलू शकत नाही. मूल नसलेल्या दाम्पत्यांच्या भावनांशी डॉक्टरांनी खेळू नये, असे म्हणत उच्च न्यायालयाने डॉक्टरांना दिलासा देण्यास नकार देत एमसीआयला २९ एप्रिलपर्यंत याचिकेवर उत्तर देण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी) $$्निपरवाना कायमचा रद्द करण्याचा इशाराआयव्हीएफ क्लिनिकच्या जाहिरातीविरुद्ध अॅडव्हर्टाइझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल आॅफ इंडियाने महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियात (एमसीआय) तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत एमसीआयने डॉक्टर दाम्पत्याचा तीन महिन्यांसाठी परवाना रद्द केला. तसेच परवाना कायमचा रद्द करण्याचा इशाराही एमसीएने त्यांना दिला.
डॉक्टरांना दिलासा नाही - उच्च न्यायालय
By admin | Published: April 16, 2016 2:42 AM