शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
3
ISRO आणि SpaceX ची भागीदारी यशस्वी, इलॉन मस्क यांनी लॉन्च केलं भारताचं सॅटेलाइट
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
5
पुतिन, झेलेन्स्कींनी मला भेटून तोडगा काढावा; तिसरे महायुद्ध टाळायलाच हवे -डोनाल्ड ट्रम्प
6
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
7
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
8
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
9
धर्म धोक्यात नाही तर आरक्षण धोक्यात आहे, श्रीकृष्ण आयोग लागू करा -प्रकाश आंबेडकर
10
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
11
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
12
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
13
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
14
निवडणूक निकालानंतर बेकायदा होर्डिंग्ज लावल्यास कारवाई करा; हायकोर्टाचे राज्य सरकार, पोलीस प्रमुखांना निर्देश
15
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
16
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
17
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
18
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
19
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
20
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार

अनिष्ट रूढीविरोधात डॉक्टरांचा पुढाकार!

By admin | Published: August 21, 2016 3:45 PM

ग्रामीण भागात वाढत असलेल्या अनिष्ट रूढींना फाटा देण्यासाठी, लाखनवाडा येथील एका डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेतला आहे.

ऑनलाइन लोकमतखामगाव, दि. २१  : ग्रामीण भागात वाढत असलेल्या अनिष्ट रूढींना फाटा देण्यासाठी, लाखनवाडा येथील एका डॉक्टरांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. स्वत:च्या आई आणि भावाच्या अंत्ययात्रेत टिटव्या ( समोर धरल्या जाणाऱ्या मडक्या) ऐवजी राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या फोटोतून समाजजागृतीचा प्रयत्न चालविला आहे.

अंत्ययात्रेत परंपरेनुसार अवास्तव महत्व असणाऱ्या टिटव्या ऐवजी अहिल्यादेवी होळकर यांचा फोटो धरुन समाजाला महापुरुषांच्या विचारांचा संदेश लाखनवाडा येथील डॉक्टर संतोष हटकर देत आहेत. ८ जून रोजीत्यांच्या आई साखराबाई विठोबा हटकर यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यावेळी पुरोगामी चळवळीचे कार्यकर्ते असलेल्या डॉक्टर संतोष हटकर यांनी पहिल्यांदा आईच्या अंत्ययात्रेत टिटवे टाळले होते. हा वैचारिक वारसा पुढे जावा म्हणून प्रयत्नशील असलेल्या संतोष हटकर यांनी शनिवारी त्यांचे भाऊ गंगाराम विठोबा हटकर (५३)यांचे निधन झाले.

आपल्या भावाच्याही अंत्ययात्रेत टिटवे न वापरता अहील्यादेवींचा फोटो घेतला. महापुरुषांचा सुधारणावादी विचार आपल्या समाजामध्ये पोहचावा म्हणून हे सुधारणावादी पाऊल उचलत, याचा प्रचार, प्रसार करण्याचा आपला संकल्प असल्याचे डॉ.हटकर यांनी सांगितले. पिंडदानाऐवजी रक्तदान!आईच्या मृत्यूनंतर पिंडदानाऐवजी रक्तदानाचा पायंडाही डॉ. संतोष हटकर यांनी पाडला आहे. ८ जून रोजी आई मृत्यूमुखी पडल्यानंतर १९ जून रोजी हटकर यांनी आईचे पिंडदान करण्याऐवजी लाखनवाडा येथे रक्तदान केले होते. या शिबिरात १७ जणांनी रक्तदान केले. महापुरूषांचा वैचारिक वारसा पुढे नेण्यासाठी कृतीशील गोष्टी करण्याचा त्यांचा प्रामाणिक प्रयत्न आहे.