मुंबई : बॉम्बे हॉस्पिटलच्या वरिष्ठ डॉक्टरांची नोंदणी स्थगित करण्याच्या मेडिकल कौन्सिल आॅफ इंडियाच्या (एमसीआय) निर्णयाला उच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. नोटीस न बजावता एमसीआय नोंदणीला स्थगिती देऊ शकत नाही, असे उच्च न्यायालयाने एमसीआयच्या निर्णयाला स्थगिती देताना म्हटले.बॉम्बे हॉस्पिटलचे आर्थोपेडीक व वरिष्ठ डॉक्टर एम. एल. सराफ यांच्या नोंदणीला एमसीआयने स्थगिती दिली. एमसीआयच्या म्हणण्यानुसार, डॉ. सराफ यांनी नोंदणीचे नूतनीकरण न करताच प्रॅक्टिस सुरू ठेवली आहे. एमसीआय नोटीस न बजावता व कोणतेही वैध कारण न देता डॉक्टरांना प्रॅक्टिस करण्यापासून रोखू शकत नाही, असे म्हणत न्या. शंतनू केमकर व अनुजा प्रभुदेसाई यांनी डॉ. सराफ यांना दोन आठवड्यांसाठी दिलासा दिला. तसेच एमसीआयला डॉक्टरांनी नोंदणी स्थगिती करण्याच्या आदेशाविरुद्ध केलेल्या अपिलावर जलदगतीने सुनावणी घेण्याचेही निर्देश दिले. सप्टेंबरच्या सुरुवातीला एमसीआयच्या अधिकाºयांनी डॉ. सराफ यांच्या नोंदणीला पाच वर्षांची स्थगिती दिली आहे. तर डॉ. सराफ यांनी केलेल्या याचिकेनुसार, त्यांनी सुरुवातीलाच २५ वर्षांसाठी नोंदणी केली होती आणि त्याचे शुल्क त्याचवेळी भरले होते.>तात्पुरता दिलासाएमसीआयने भूमिका स्पष्ट करताना म्हटले की, डॉ. सराफ यांच्या नोंदणीला स्थगिती देण्यापूर्वी चौकशी केली होती. त्यावर न्यायालयाने म्हटले की, ‘नोटीस न देता व वैध कारण न देता डॉक्टरची प्रॅक्टिस थांबवली जाऊ शकतो का? याविषयी एमसीआयने माहिती द्यायला हवी होती,’ असे म्हणत न्यायालयाने डॉ. सराफ यांना दोन आठवड्यांचा दिलासा दिला.
डॉक्टरांच्या नोंदणीला स्थगिती नाही, एमसीआयच्या निर्णयाला स्थगिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 5:17 AM