शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

डॉक्टर महिलेने केला पतीचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2015 4:24 AM

रागाच्या भरात बेभान झालेल्या महिलेने नवऱ्याच्या छातीवर बसून चाकूचे वार करून हत्या केली. रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत

नागपूर : रागाच्या भरात बेभान झालेल्या महिलेने नवऱ्याच्या छातीवर बसून चाकूचे वार करून हत्या केली. रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास शहरातील हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही थरारक घटना घडली. विशेष म्हणजे, आरोपी पत्नी पेशाने दंत चिकित्सक आहे. टिष्ट्वंकल रविकांत उके (४०) असे तिचे नाव असून, पोलिसांनी तिला हत्येच्या आरोपाखाली अटक केली आहे. श्रीरामनगर येथे सिंचन विभागाचे निवृत्त अभियंता मधुकर रामचंद्र उके यांचे दुमजली निवासस्थान आहे. तळमजल्यावर मधुकर आणि त्यांची पत्नी मृदुलता (६७) राहतात. तर, पहिल्या मजल्यावर मुलगा रविकांतचा परिवार राहात होता. रविकांत आणि टिष्ट्वंकलला रुजल नामक ८ वर्षांचा मुलगा आहे.रविकांत पोलिओग्रस्त होता. तो पॅथॉलॉजी चालवायचा. तेथेच टिष्ट्वंकलचे छोटेसे दंत क्लिनिक होते. ती शीघ्रकोपी स्वभावाची होती. स्वत: कमवत असल्यामुळे पतीची कोणतीही गोष्ट ऐकून घेत नसे. सारखी चिडचिड करायची. तिच्या अशा वागण्यामुळे रविकांत तिच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. यातून दोघांमध्ये नेहमीच खटके उडायचे. रविवारी टिष्ट्वंकलचे वडील तेथे आले होते. रात्री सासऱ्याशी बोलताना रविकांतने टिष्ट्वंकल नीट वागत नसल्याची तक्रार केली. त्यावरून त्या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. शब्दाने शब्द वाढले. या वेळी रवी पलंगावर झोपला होता. टिष्ट्वंकलने घरातील चाकू हातात घेतला आणि रविकांतच्या छातीवर बसून त्याच्या वर्मी घाव घातले. छाती-पोटावर एकापाठोपाठ अनेक घाव घातल्याने रविकांतने किंकाळी फोडली. ती ऐकून त्याचे आईवडील वर धावले.रविकांत रक्ताच्या थारोळ्यात पडून होता. तर, टिष्ट्वंकलच्या हातात चाकू होता. मृदुलता यांनी तिच्याकडे धाव घेत चाकू पकडला. त्यामुळे त्यांच्याही हाताला जखम झाली. यानंतर टिष्ट्वंकल पळून गेली. मधुकर उके यांनी रविकांतला तातडीने डॉक्टरकडे नेले. मात्र, रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला.पोलिसांनी टिष्ट्वंकलविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला. तसेच टिष्ट्वंकलवर दबाव वाढवण्यासाठी पोलिसांनी तिच्या वडिलांकडून तिला फोन करवून घेतला. ती कुठे आहे, ते सांगत नव्हती. ‘तुझ्यामुळे पोलीस मला अटक करतील,’ असे वडिलांनी तिला सांगितले. दोष नसताना रविकांतच्या हत्येच्या आरोपात पोलीस आपल्या वडिलांना अटक करू शकतात, ही भीती वाटल्यामुळे टिष्ट्वंकलने पोलिसांना आपले लोकेशन कळविले. त्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेतले.