पुणे : सतीश खंडारे हे वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून काश्मीरमध्ये कार्यरत होते़. लग्नानंतर मी गृहिणी म्हणून काश्मीरला गेले होते़. तेव्हा लॅडलाईनवर एक फोन आला व त्यांनी त्यांच्याविषयी चौकशी केली़. तेव्हा साहेब आताच घरातून कामाला गेले असल्याची माहिती मी फोन करणाऱ्याला दिली़. यावेळी आमच्या घरात एका सिनिअरची पत्नी बसली होती़. त्यांनी मला सांगितले अशा प्रकारे लँड लाईनवर आलेल्या फोनवर समोर कोण बोलतोय याची ओळख नसताना कोणालाही अधिकारी कोठे गेले आहेत, याची माहिती द्यायची नसते़, हे काश्मीर आहे़. या माहितीवरुन दहशतवादी त्यांच्या मार्गात काहीही करु शकतील़. हे ऐकून मला धक्काच बसला़. इथले जीवन किती जिकिरीचे आहे, याची छोटीशी झलक तेव्हा मला मिळाली होती़ .त्यानंतर असे अनेक अनुभव येत गेले़ तेव्हा मी पोलीस अधिकारी नव्हते़, अशी दोन वर्षे काश्मीरात गृहिणी म्हणून काढली आहेत. असा अनुभव पौर्णिमा यांनी सांगितला.
आपण आणि सतीश खंडारे यांचा परिचय कसा झाला?मी मुळची सोलापूरची़ माझे वडिल पोलीस अधीक्षक काशीनाथ गायकवाड़ त्यामुळे पोलिसांच्या कुटुंबात असलेल्या वातावरणाशी माझा परिचय होता़. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून शिक्षण घेतले़. सतीश खंडारे हे धामणगावचे़ आमचा रितसर पाहून विवाह झाला़. त्यावेळी ते जम्मू काश्मीरमध्ये नेमणूकीला होते़. लग्नानंतर सुमारे दोन वर्षे मी गृहिणी म्हणून त्यांच्याबरोबरच काश्मीरमध्ये त्यांचे पोस्टिंग होते तेथे होते़ . रियासी आणि बडगाम येथे ते पोलीस अधीक्षक असताना मी त्यांच्यासमवेत काश्मीरमध्ये होते. तेव्हा मला काश्मीरमधील जीवन किती जिकीरीचे आहे, याचा अनुभव आला़ त्यानंतर मी महाराष्ट्रात पोलीस सेवेत एमपीएससी मार्फत रुजू झाले़.
तुम्ही दोघेही पोलीस सेवेत एकत्र कधी काम केले ? काश्मीरातील सतीश खंडारे यांचा १० वर्षाच्या कालावधी पूर्ण झाल्यावर ते प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रात आले़ ते हिंगोलीला पोलीस अधीक्षक म्हणून होते. त्यावेळी मी प्रशिक्षणार्थी म्हणून शेजारच्या जिल्ह्यात होते़. ते नागपूरला नक्षलवाद विरोधी विभागाचे उपमहानिरीक्षक होते़. त्यावेळी माझी नागपूरला एसआयडीला नियुक्ती होती़ आमच्या दोघांच्या घरच्याच्या पाठिंब्यांमुळे आम्ही आजवर संसार करु शकलो़. आम्हाला एक मुलगी असून ती सध्या पुण्यात शिक्षण घेत आहे़.
* खंडारे हे पोलीस प्रमुख झाल्याचे कधी समजले ?श्रीनगरहून काश्मीरची राजधानी हिवाळ्यात जम्मूला हलविली जाते़. हे काम सुरु असल्याने त्यांना सुट्टी मिळाली होती़. त्यामुळे ते आता दिवाळीत पुण्यात आले.होते़ मात्र, त्यांना अचानक बोलावून घेण्यात आले़. त्यानंतर त्यांच्या नियुक्तीची माहिती मिळाली़. खंडारे यांची लडाख च्या पोलीस प्रमुखपदी नियुक्ती झाल्याचा आनंद आहे़.
* सरांना आता मोठी पोस्ट मिळाली, त्याविषयी काय वाटते?काश्मीरच्या मानाने लडाख खूप शांत आहे़ पूर्वी तो काश्मीरचाच एक भाग होता़. त्यामुळे साहेब त्या भागाशी तसे परिचित आहेत़ पण, आता तो स्वतंत्र झाला आहे़. त्यामुळे अगदी मुख्यालयापासून अनेक बाबी नव्याने उभाराव्या लागणार आहेत़ त्यांच्यासाठी काम करुन दाखविण्याची एक मोठी संधी आहे़ . आयपीएसच्या कॅडरमध्ये गेल्यानंतर प्रतिनियुक्तीची संधी मिळाल्यास लडाखला जायला आवडेल़...................लग्नानंतर पोलीस अधिकारी नसताना काश्मीरमध्ये गेल्यावर तेथील पोलीस अधिकारी कोणत्या परिस्थितीत काम करतात, याची पूर्ण कल्पना नव्हती़. त्यामुळे तेव्हा खूप चिंता वाटत नव्हती़. पण आता पोलीस अधिकारी म्हणून प्रशिक्षण घेतले आहेत़. महाराष्ट्रात मी कार्यरत आहे़. त्यामुळे काश्मीरमध्ये तेथील पोलीस अधिकारी व कर्मचारी कोणत्या परिस्थितीत काम करत असतील याची पूर्ण कल्पना असल्याने आता अधिक काळजी वाटत असते, असेपोर्णिमा गायकवाड यांनी सांगितले़.