शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
VIDEO: क्रिकेट मॅचमध्ये तुफान राडा! खेळाडूंमध्ये हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी झाली तुडवातुडवी
3
"हिंदूंसोबत विश्वासघात, देव..."; तिरुपतीच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी प्रकरणावरून भाजपची प्रतिक्रिया
4
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विदर्भातील स्वागतासाठी भाजपाची जय्यत तयारी, तर काँग्रेसचे १० सवाल
5
सातारा: अल्पवयीन मुलाचा ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; घराच्या टेरेसवर घडला किळसवाणा प्रकार
6
हातात खराटा अन् स्वच्छतेचा मंत्र... नागपुरात रेल्वे व्यवस्थापकांनी केली स्थानकावर साफसफाई
7
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
8
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
9
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
10
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
11
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
12
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
13
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
14
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
15
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
16
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
17
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
18
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
19
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
20
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश

"हा पैसा यांच्या बापाचा आहे का?", लाडकी बहीण योजनेवरील रवी राणांच्या वक्तव्यानंतर विजय वडेट्टीवार संतापले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2024 5:39 PM

Vijay Wadettiwar : रवी राणा यांनी हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोललं आहे. रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी, अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे.

Vijay Wadettiwar : छत्रपती संभाजीनगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून पात्र महिलांना दरमहा १५०० रुपये मिळणारआहे. या योजनेचा पहिला हप्ता १७ ऑगस्ट रोजी जमा होणार आहे. त्यामुळं राज्यातील महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे. 

अशातच या योजनेवरुन अमरावतीतील आमदार रवी राणा यांनी एक धक्कादायक वक्तव्य केलं आहे. आम्हाला आशीर्वाद दिला नाही तर लाडक्या बहिणींच्या खात्यातून १५०० परत घेण्यात येतील, असं धक्कादायक वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केलं आहे. रवी राणांच्या या वक्तव्यावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.

रवी राणा यांनी हे शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं बोललं आहे. रवी राणांचं वक्तव्य महाराष्ट्रातल्या महिलांचा अपमान आहे, त्याबद्दल सरकारनं माफी मागावी, अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, हा सरकारचा पैसा आहे. हा पैसा यांच्या बापाचा आहे का? रवी राणा की मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा आहे? असा सवाल करत यांची निती दिसली. निवडणुकीच्या तोंडावर मतांसाठी योजना आणली. बहिणींना फसवण्यासाठी योजना आणली, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

रवी राणा जे बोलले ते सरकारच्या मनातील आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवारांच्या मनातलं रवी राणा बोलले आहेत. मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी. आमच्या बहिणी दीड हजार रुपयाला मत विकतील का? हा महाराष्ट्रातील महिलांचा अपमान आहे. बहिणीचा अपमान आहे. ही योजना मतांसाठी आणली होती, सरकारनं राज्यातील बहिणीची माफी मागितली पाहिजे, अशी मागणीही विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

रवी राणा नेमकं काय म्हणाले?आमचं सरकार आल्यावर लाडकी बहिण योजनेचे १५०० रुपये हे आम्ही दुप्पट म्हणजे ३ हजार रुपये करू, तर आता त्यासाठी मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मात्र, ज्यांनी मला आशीर्वाद दिला नाही, तर मी तुमचा भाऊ म्हणून ते १५०० रुपये तुमच्या खात्यातून वापस घेणार, असे वक्तव्य रवी राणांनी केलं. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्रमाणपत्र वितरण सोहळा आज अमरावतीत  रवी राणा यांनी घेतला होता. या कार्यक्रमात हजारो महिला उपस्थित होत्या. या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं. ज्याचं खाल्लं त्याचं जागलं पाहिजे. सरकार देत राहतं, पण सरकारला आशीर्वादही दिला पाहिजे, असंही मत रवी राणा यांनी यावेळी मांडलं.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारRavi Ranaरवी राणाMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारण